आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य रेषा तुटलेली किंवा अस्पष्ट असल्यास कसा राहतो प्रभाव?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य रेषा अनामिकेच्या (रिंग फिंगर) ठीक खालील भाग असलेल्या सूर्य पर्वतावर असते. या भागावर जी रेषा उभ्या स्थितीमध्ये असते, तिला सूर्य रेषा म्हणतात. सूर्य पर्वतावर असल्यामुळे या रेषेला सूर्य रेषा असेही म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर ही रेषा दोष रहित असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर मान-सन्मान आणि पैसा मिळतो. उज्जैनच्या हस्तरेषा ज्योतिष विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार सूर्य रेषा इतर रेषांनी कापलेली किंवा तुटलेली असेल तर या रेषेचा शुभ प्रभाव कमी होतो. येथे जाणून घ्या, सूर्य रेषेशी संबंधित काही खास गोष्टी...


> जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरील आयुष्य रेषेपासून सूर्य रेषा निघून अनामिकेपर्यंत गेली असेल तर तो व्यक्ती भाग्यशाली असतो. अशा लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात तसेच मान-सन्मान प्राप्त होतो.


> असे लोक नेहमी सुखी राहतात, ज्यांचा हातावर सूर्य रेषा बृहस्पती पर्वत (इंडेक्स फिंगरच्या खालील भागाला गुरु पर्वत म्हणतात)पर्यंत जात असेल. गुरु पर्वतापर्यंत पोहोचून सूर्य रेषा शेवटी एखाद्या ताऱ्याचे चिन्ह तयार करत असेल तर असा व्यक्ती मोठा अधिकारी बनतो.


> जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर सूर्य पर्वत(रिंग फिंगरच्या खालील भागाला सूर्य पर्वत म्हणतात)वर सूर्य रेषा पोहोचून एक शाखा शनि पर्वता(मधल्या बोटाखाली शनि पर्वत असतो) कडे आणि एक शाखा बुध पर्वता (करंगळीच्या खालील भागावर बुध पर्वत असतो) कडे जात असेल तर असा व्यक्ती बुद्धिमान, चतुर, गंभीर असतो. या लोकांना समाजात मान-सन्मान आणि भरपूर पैसा प्राप्त होतो.


> सूर्य रेषा भाग्यरेषेपासून निघून अनामिका बोटापर्यंत जात असेल तर ही शुभ प्रभाव दर्शवणारी स्थिती आहे. या शुभ प्रभावाने व्यक्तीला भरपूर पैसा आणि मान-सन्मान मिळतो. सूर्य रेषा मणिबंधापासून अनामिकेपर्यंत असेल तर ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. हे लोक जीवनात यशस्वी होतात आणि भरपूर पैसा मिळवतात.


> जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर सूर्य रेषेसोबतच एक किंवा त्यापेक्षा अधिक उभ्या समांतर रेषा असतील तर या रेषा सूर्य रेषेच्या शुभ प्रभावामध्ये अधिक वृद्धी करतात. अशा प्रकरच्या रेषांमुळे व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी, धन-ऐश्वर्य प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...