Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

साध्य नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे महिन्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात, गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात

रिलिजन डेस्क

Sep 01,2019 12:05:00 AM IST

रविवार 1 सप्टेंबर रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ४ कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही चांगला मिळेल.हितशत्रूंचा उपद्रव मात्र वाढणार आहे. सतर्क रहा.द्विधा मन:स्थिती असताना महत्वपूर्ण निर्णय टाळा.वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३ आज अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. तरूण मंडळींचे वर्तन बेशिस्तपणाचे असेल. आज आपल्या मर्यादा अोळखून, कायद्यात रहाणे गरजेचे.मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : १ आज तुम्ही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल.मातोश्रींकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे फाजिल लाड बंद करणे गरजेचे आहे.कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ महत्वाच्या कामासाठी भटकावे लागणार आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. एखाद्या कामासाठी आज शेजाऱ्यांची मदत होईल. प्रकृतीवर ताण पडेल.सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८ आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल. खिशात पैसा खेळता असल्याने कार्यक्षमता वाढेल. चांगली माणसे संपर्कात येतील. मित्रवर्गाचे सहकार्य उत्तम राहील.कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ६ अत्यंत उत्साहात व आकर्षक पेहरावात घराबाहेर पडाल. आज तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ कंजूषपणा बाजूस ठेऊन आज आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही प्रसंगी संयमाची कसोटी राहील. वडीलधाऱ्या मडळींचे विचार समजून घ्यावे लागतील.वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९ कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल. विरोधकही सहकार्याचा हात पुढे करतील. लाभातील चंद्र आर्थिक सुबत्ता देणारच आहे. छान दिवस.धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७ नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वृध्दी होईल. तुम्ही जीव ओतून काम कराल. रिकामटेकड्या वादविवादात मात्र आज तटस्थ रहा. मित्रांना उद्याच यायला सांगा.मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २ थोडीफर मानसिक अस्वस्थता जाणवेल. घरातील थोरांशी जमवून घेणे कठीण जाईल. आज कमीच बोलणे हिताचे राहील. सत्संगाची ओढ लागेल.कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ३ आज स्वत:चेच चालवण्याचा अट्टहास न करता काही निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने घेणे गरजेचे राहील. आज जोखमीची कामे टाळलेली बरी. वाहन हळू चालवा.मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ४ कोणत्याही क्षेत्रात असलात तरी आज स्पर्धा अटळ आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे येईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका.

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ४ कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही चांगला मिळेल.हितशत्रूंचा उपद्रव मात्र वाढणार आहे. सतर्क रहा.द्विधा मन:स्थिती असताना महत्वपूर्ण निर्णय टाळा.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३ आज अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. तरूण मंडळींचे वर्तन बेशिस्तपणाचे असेल. आज आपल्या मर्यादा अोळखून, कायद्यात रहाणे गरजेचे.

मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : १ आज तुम्ही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल.मातोश्रींकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे फाजिल लाड बंद करणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ महत्वाच्या कामासाठी भटकावे लागणार आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. एखाद्या कामासाठी आज शेजाऱ्यांची मदत होईल. प्रकृतीवर ताण पडेल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८ आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल. खिशात पैसा खेळता असल्याने कार्यक्षमता वाढेल. चांगली माणसे संपर्कात येतील. मित्रवर्गाचे सहकार्य उत्तम राहील.

कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ६ अत्यंत उत्साहात व आकर्षक पेहरावात घराबाहेर पडाल. आज तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ कंजूषपणा बाजूस ठेऊन आज आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही प्रसंगी संयमाची कसोटी राहील. वडीलधाऱ्या मडळींचे विचार समजून घ्यावे लागतील.

वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९ कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल. विरोधकही सहकार्याचा हात पुढे करतील. लाभातील चंद्र आर्थिक सुबत्ता देणारच आहे. छान दिवस.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७ नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वृध्दी होईल. तुम्ही जीव ओतून काम कराल. रिकामटेकड्या वादविवादात मात्र आज तटस्थ रहा. मित्रांना उद्याच यायला सांगा.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २ थोडीफर मानसिक अस्वस्थता जाणवेल. घरातील थोरांशी जमवून घेणे कठीण जाईल. आज कमीच बोलणे हिताचे राहील. सत्संगाची ओढ लागेल.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ३ आज स्वत:चेच चालवण्याचा अट्टहास न करता काही निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने घेणे गरजेचे राहील. आज जोखमीची कामे टाळलेली बरी. वाहन हळू चालवा.

मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ४ कोणत्याही क्षेत्रात असलात तरी आज स्पर्धा अटळ आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे येईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका.
X
COMMENT