आजचे राशिभविष्य : / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रविवारचे राशिफळ : आज ज्ञानाची देवी सरस्वती उपासनेचा दिवस वसंत पंचमी आणि जुळून येत आहे आणखी एक खास योग, 2 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील खास... 

Feb 10,2019 12:00:00 AM IST

रविवार 10 फेब्रुवारीला अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. आज वसंत पंचमी आहे. यासोबतच आज रेवती नक्शत्रामुळे साध्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. थोरांचे अनुभवाचे बोल ऐकून घ्यावेत. अती आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल. शुभ रंग : चंदेरी | अंक : ३वृषभ : आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल. शुभ रंग : क्रिम | अंक : ५मिथुन : आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडू शकेल. सामंजस्याचे धोरण हिताचे. शुभ रंग : पिस्ता | अंक : ७कर्क : नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. शुभ रंग : हिरवा | अंक : ९सिंह : कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. शुभ रंग : मरून | अंक : २कन्या : व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका. शुभ रंग : लाल | अंक : ४तूळ : वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा. शुभ रंग : अबोली | अंक : ७वृश्चिक : सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस. शुभ रंग : निळा | अंक : ६धनू : आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९मकर : आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागेल. शुभ रंग : डाळिंबी | अंक : २कुंभ : आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. शुभ रंग : पिवळा | अंक : ३मीन : आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल. शुभ रंग : पांढरा | अंक : १
X