Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

दिव्य मराठी | Update - Mar 10, 2019, 12:00 AM IST

रविवार राशीफळ : ब्रह्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सुटीच

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  रविवार 10 मार्च रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  मेष : आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रूसवे फुगवे असतील. शुभ रंग : राखाडी | अंक : ९

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  वृषभ : कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हीताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.  शुभ रंग : केशरी | अंक : ७

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  मिथुन : दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. दिवस लाभाचा असल्याने व्यवसायात एखादे धाडस करायला हरकत नाही. आप्तस्वकियांत तुमच्या शब्दाला मान राहील. शुभ रंग : तांबडा | अंक : ५

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  कर्क : नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी अश्वासने देऊन राबवून घेतील. कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल. शुभ रंग : पांढरा | अंक : ४

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  सिंह : व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल. विलासी वृत्तीवर अंकूश ठेवावा लागेल. मानसिक  शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही. शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  कन्या : भागिदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.  शुभ रंग : आकाशी | अंक : १

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  तूळ : आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित रहाल. छान दिवस. शुभ रंग : पिवळा | अंक : ७

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  वृश्चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.  शुभ रंग : हिरवा| अंक : २

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  धनू : तुमचा उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.आनंदी दिवस. शुभ रंग : आकाशी| अंक : ८

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  मकर : अध्यात्मिक  मार्गात  प्रगती होईल. विद्यार्थी अभ्यासात  एकाग्रता साधू शकतील. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.  शुभ रंग : मोरपंखी| अंक : 3 

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  कुंभ : अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अतीहुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा.  शुभ रंग : नारिंगी | अंक : ४   

 • Sunday 10 March 2019 Daily horoscope in marathi

  मीन : राशीच्या धनस्थानातून चंद्र भ्रमण सुरु असताना पैसा कमी पडणार नाही. घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. आज काैटुंबिक जिवनांत सलोखा व मधुरता राहील.  शुभ रंग : अबोली | अंक : ९  

Trending