Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

रिलिजन डेस्क | Update - Jan 13, 2019, 12:00 AM IST

रविवारचे राशिफळ : अशुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात तरीही 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास, हे आहे कारण..

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    रविवार 13 जानेवारी 2019 ला उत्तर भाद्रपद आणि रेवती नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अशुभ तर सकाळी 7:15 नंतर शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    मेष : आज घराबाहेर वादविवादात सामंजस्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज रागावर ताबा हवा. शुभ रंग : सोनेरी | अंक : १

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : तुमच्यासाठी सगळा दिवस अनुकूल आहे. तुमचे कार्यक्षेत्रातील महत्व वाढेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विरोधकही तुमचे वर्चस्व मान्य करतील. शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : नोकरीच्या ठीकाणी पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळवून देणारा  दिवस अाहे. वरीष्ठ  तुमच्यावर  खूष  असतील. बढतीच्या  मार्गातील अडथळे आता दूर  होतील.  शुभ रंग : पिवळा | अंक : ३

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    कर्क : आज मनांत काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. घरातील थोरांचे विचार समजून  घ्यावे लागतील. तुम्हाला एकांत हवासा वाटेल. शुभ रंग : आकाशी | अंक : १

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : आज तुमचे मनोबल कमीच असेल. मनाच्या द्विधा अवस्थेत महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज धाडस टाळा.  शुभ रंग : भगवा | अंक : ८ 

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : आज वैवाहीक जिवनांतील काही जुन्या स्मृती मनास आनंद दंतील. व्यवसायांत भागिदारांशी सामंतस्य राहील. सकारात्मकतेने नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल.  शुभ रंग : जांभळा | अंक : ६

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : कामाच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढण्याची शकयता आहे. आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. रूग्णांनी डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात. शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांत सामंजस्य राहील. नवोदीत कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. खेळाडू स्पर्धा गाजवतील. गृहीणी आज स्वत:साठी वेळ काढतील.  शुभ रंग : राखाडी | अंक : २

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    धनू : नेहमीची कामे सुरळीत पार पडतील. प्रापर्टी विषयी रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रेमप्रकरणे मात्र गोत्यात आणतील.   शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    मकर : आज काहीशी आक्रमक वृत्ती राहील. तुमच्यात उच्च प्रतीचा आत्मविश्वास राहील. इतरांपेक्षा काही वेगळेच करून दाखवायची उमेद असेल. अती धावपळ टाळा. शुभ रंग : डाळींबी | अंक : ७

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : चांगली माणसे संपर्कात येतील. नव्या योजना उत्तम प्रकारे राबवता येतील. आज कामगारांना केलेल्या कष्टांचा योग्य मोबदला मिळेल. यशदायी दिवस. शुभ रंग : केशरी | अंक : ५

  • aajche rashibhavsihya Sunday 13 January 2019 daily horoscope in Marathi

    मीन : आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. अहंकारामुळे काही हितसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. वाणीत मृदुता असणे अत्यंत गरजेचे अाहे. शुभ रंग : निळा | अंक : ४ 

Trending