आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 13 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तर भाद्रपदा आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्‍याघात नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्‍या प्रभावामुळे 12 राशींवर विविध परिणाम होतील. व्‍याघात योगामुळे 6 राशींच्‍या लोकांना रविवारी अडचणींना सामोरे जावे लागू शकते तर उर्वरित 6 राशींसाठी हा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : ७
अती उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार आज दुपारनंतरच करा. वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजतील.                                                                     

वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ३
कितीही पैसा आला तरी तो जाण्याचे मार्गही आधीच तयार असतील. जमाखर्चाचा तराजू समतोलच राहील.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. कुसंगती टाळाच.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
नोकरीत कामाशी प्रामाणिक असाल. आज आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. वरीष्ठही तुमच्या अडचणी समजून घेतील.


कर्क :  शुभ रंग : मोरपंखी | अंक
: ५
उद्योगधंद्यात मेहनत व चिकाटीच कामी येईल. मोठी स्वप्ने बघताना वास्तवाचे भान असणेही गरजेचे आहे. दुपारनंतर एखाद्या अनुकूल घटनेने उत्साह वाढेल.

सिंह : शुभ रंग : अबोली| अंक : २
मनाविरूध्द घटनांनी बेचैन व्हाल. आज कुणाकडे सल्ले मागत बसू नका. आज तुम्हाला एकांताची तसेच सत्संगाची गरज भासेल. उपासना मानसिक बळ देईल.      

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ९
उद्योगधंद्यातील महत्वपूर्ण करार मदार दुपारपूर्वीच उरकून घ्या. संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क रहा. वैवाहीक जिवनांत  दुपारनंतर मौन सर्वार्थ साधनम.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
आज कार्यक्षेत्रात काही  पेचप्रसंगांना सामोरे जावे लागेल.  क्वचित प्रसंगी अडला हरी....या म्हणीचा प्रत्यय येईल. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येईल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात आजचा संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.    


धनू :  शुभ रंग : सोनेरी| अंक
: ४
आज तुम्ही आपले आवडते छंद व व्यासंग जपण्यासाठी आवर्जुन वेळ कढाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीत जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. गृहाेद्योग तेजीत चालतील.  

मकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
थोडयाफार काैटुंबिक कटकटींवर जोडीदाराच्या सहाय्याने मात कराल. बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा. खोट्या सह्या करणारे अडचणीत येतील.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : २ 
आज उंची राहणीमानाकडे कल राहील. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. खिशात पैसा खेळता असल्याने स्वत:चा मोठेपणा जपता येईल. 

मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ६
आज हातचे सोडून मृगजळामागे धावायचा मोह होईल. काही चुकीचे सल्ले देणारी माणसे भेटतील. कोणतेही  निर्णय  जोडीदाराच्या  सल्ल्यानेच  घ्या.

बातम्या आणखी आहेत...