Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

पं. जयंत कुळकर्णी,29.jpg | Update - Jul 14, 2019, 12:25 AM IST

12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील खास. करिअरमध्ये पुढे जाण्याची मिळेल संधी, जॉब आणि बिझनेसमध्ये होऊ शकतो फायदा

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  रविवार, 14 जुलै 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. रविवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार....

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ३
  काही मनाविरूध्द घटना घडतील. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. आज तुमचा देवधर्माकडे कल राहील. एकांताची गरज वाटेल. 

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
  काही महत्वाची कामे असतील तर आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्यावीत. आज वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेफार मतभेद संभवतात. शांत रहा. 

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ६                                                                             कोणतीही गोष्ट सहज साध्य होईल या भ्रमात राहू नका.ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी गोडीगुलाबी राहील.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४                                                             
  नोकरी व्यवसायात आज उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. काही येणी वसूल होतील. प्रेमवीरांनी संध्याकाळी न भेटलेलेच बरे. 

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग :मोरपंखी | अंक : १                                                             
  आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत  वाढेल.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : हिरवा |अंक : २                                                                           महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. आज काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. वाद टाळलेले बरे.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
  पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. विद्यार्थ्याना अभ्यासाचे ओझे वाटेल.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : मरून |अंक : ५
  आज आर्थिक अडचण दुपारनंतर अकस्मिकरीत्या दूर होईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. आप्तस्वकीय तुमच्याशी जवळीक साधतील. 

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ८                   
  नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने  मनावर घेऊ नका. महत्वाच्या कामासाठी भ्रमंती होईल.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : १                       
  अनावश्यक खर्चात कपात करून बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी काही मोठे खर्च उद्भवतील. अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ४
  आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात अधिकारात वृध्दी होईल. संध्याकाळी करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. अनपेक्षित लाभ होईल.

 • sunday 14 july 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
  आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील.

Trending