आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 15 डिसेंबर रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ब्रह्मा आणि ऐंद्र नावाचे 2 शुभ योग तयार करत आहे. या 2 शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • मेष: शुभ रंग : मोतिया | अंक : ८

आज काही घरेलू प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्याल. काही दूरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हितसंबंधात सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील.

  • वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ५

आवक मनाजोगती असली तरी पैशाची उधळपट्टी टाळणे गरजेचे आहे. उद्योगव्यवसायात जाहीरातींवर खर्च करावा लागेल. शेजारी आपलेपणा दाखवतील.

  • मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : १

ज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. गरजुंच्या मदतीस धावून जाल. आज भावंडात मात्र काही क्षुल्लक मतभेद संभवतात.

  • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. प्रतिष्ठीतांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षांना खतपाणी मिळेल. आज विवाहविषयक बोलणी सामंजस्याने पार पडतील. 

  • सिंह : शुभ रंग : मरून | अंक : २

नोकरी व्यवसायात चढाओढ वाढली आहे.गुंतवणूक करताना  झटपट लाभाचा मोह टाळा. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वाद टाळा.

  • कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४

अचानक हाती आलेला पैसा तुमची उमेद वाढवेल. व्यवसायात उद्दीष्टे सहज पूर्ण झाल्याने मनावरील काळजीचे सावट दूर होईल. इच्छापूर्ती होईल. 

  • तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ५

नोकरदारांना वरीष्ठांच्या खोचक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. अधिकारांचा गैरवापर टाळा. कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. दैवाची साथ लाभेल.

  • वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ८

कार्यक्षेत्रात कितीही अडचणी आल्या तरी दैव आज तुमच्याच बजूने आहे. प्रामाणिक प्रयत्न कारणी लागतील. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न राहील.

  • धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : २

कोणतेही धाडस टाळा. आपल्या सुरक्षेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरूणांनी मर्यादा सांभाळाव्या. नीतीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येईल. 

  • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

आज सहकाऱ्यांशी मिळून मिसळूनच कामे होतील. अहंकाराची बाधा नको. प्रसंगी विरोधकांनाही चहा पाजणे गरजेचे राहील. जोडीदाराचे मन दुखाऊ नका.

  • कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ७

कार्यक्षेत्रात काही हितशत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल. नवीन ओळखीत विश्वास ठेवणे हिताचे नाही.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. भिडस्तपणा नको. 

  • मीन : शुभ रंग : केशरी | अंक : ६

पैशाची कमतरता नसल्याने चैनी व विलासी वृत्ती जोपासता येईल. काही रसिक मंडळी सहकुटुंब सहलीचे बेत आखतील. आज प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील. 

बातम्या आणखी आहेत...