Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

दिव्य मराठी | Update - Mar 17, 2019, 12:00 AM IST

रविवार राशीफळ : आज जुळून येत आहे रविपुष्य योग, जाणून घ्या 12 पैकी किती राशीच्या लोकांना होणार लाभ आणि कोणी राहावे सतर्क

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  रविवार 17 मार्च 2019 रोजी पुष्य नक्षत्र असल्यामुळे बहुतांश राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. यासोबतच आज आमलकी एकादशी आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ग्रह-स्थितीच्या प्रभावाने इनकम, प्रॉपर्टी, सेव्हिंग, सुख आणि प्रेम वाढेल. नोकरीत पद आणि सन्मान वाढेल. व्यवसायात फायदा होईल. या योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल तर इतर चार राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण पुरेसे राहील. वाढत्या कौटुंबिक मागण्या सहज पूर्ण करू शकाल. प्रॉपर्टीचे व्यवहार फायदेशीर होतील. प्रेमप्रकरणांपासून दूर राहीलेले बरे. शुभ रंग : राखाडी| अंक : १

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : व्यवसाय वृध्दीच्या दृष्टीने महत्वाचे करार व गाठीभेटी होतील. स्थावराचे व्यवहार मात्र दोन दिवस पुढे ढकललेत तर बरे. अडचणीत शेजाऱ्यांची मदत मिळेल. शुभ रंग : पांढरा| अंक : ९

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या चिकाटीचे फळ मिळेल. नवोदीतांची प्रसिध्दीची हौस भागेल. तब्येत ठणठणीत असल्याने प्रत्येक कामात उत्साह राहील.  शुभ रंग : केशरी | अंक : ७

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : नव्या व्यावसायिक योजना वेगवान होतील. सार्वजनिक जिवनात प्रतिष्ठा वाढेल. हाताखालच्या लोकांकडून गोड बोलूनच कामे करून घ्यावीत. मीपणास लगाम गरजेचा. शुभ रंग : मोतिया | अंक : ६ 

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : आज काम कमी व दगदगच जास्त अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च फार होईल. मित्रमंडळींनी केलेल्या खोटया स्तुतींनी भारावून जाल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल. योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्रांवर अजिबात विसंबून राहू नका. शुभ रंग : क्रिम| अंक : ४

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. शासकिय कामातही काही कारणाने विलंब होईल. अधिकरांचाही गैरवापर टाळायला हवा. शुभ रंग : जांभळा| अंक : २

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. कष्टांचाही अतिरेक टाळा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणे गरजेचे आहे. विश्रांती गरजेची. शुभ रंग : भगवा | अंक : ५  

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : जमेची बाजू भक्कम असेल. वादविवादात आज आपली बाजू परखडपणे मांडू शकाल. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आलेख चढता राहील. मनासारखी चैनही करता येईल. शुभ रंग : नारिंगी | अंक : ८

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.  शुभ रंग : गुलाबी | अंक : १

 • aajche rashibhavishya sunday 17 March 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही.  शुभ रंग : हिरवा | अंक : २

Trending