Today's horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी या 8 राशीचे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये राहतील लकी

रिलिजन डेस्क

Jul 18,2019 12:05:00 AM IST

गुरुवार 18 जुलै रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे राशीचक्रातील 12 राशींपैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : लाल | अंक : ८ कार्यक्षेत्रात आपले महत्व सिध्द करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या व्यापात प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ काही क्षुल्लक कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता. नोकरदारांना अधिकारी खोटी अश्वासने देतील.मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : ७ व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहेे.कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल. आज घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. प्रवासात खोळंबा होऊ शकतो. मूर्खांशी वाद टाळा.सिंह : शुभ रंग : डाळींबी | अंक : २ महत्वाची कामे रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. काम कमी व धावपळ जास्त होईल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ जिवलग मित्रांच्या सहवासात काही जुन्या गमती जमतींना उजाळा द्याल. प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या रोमँटीक चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ वाहन खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. प्रेम प्रकरणात नसती अाफत होईल.वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : १ उद्योग व्यवसायात आपल्या कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. आज वाद टाळा.धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : २ धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल.मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३ मनोबल उत्तम राहील. आकर्षक पेहरावात घराबाहेर पडाल. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. महत्वपूर्ण चर्चेत आपले मत परखडपणे मांडाल.कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ५ अनावश्यक खर्चास लगाम घालून भविष्यासाठी गुंतवणूक करण्याकडे आज तुमचा कल राहील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेजच्या नोकरीच्या संधी येतील.मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल. दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील.

मेष : शुभ रंग : लाल | अंक : ८ कार्यक्षेत्रात आपले महत्व सिध्द करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या व्यापात प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ काही क्षुल्लक कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता. नोकरदारांना अधिकारी खोटी अश्वासने देतील.

मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : ७ व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहेे.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल. आज घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. प्रवासात खोळंबा होऊ शकतो. मूर्खांशी वाद टाळा.

सिंह : शुभ रंग : डाळींबी | अंक : २ महत्वाची कामे रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. काम कमी व धावपळ जास्त होईल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.

कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ जिवलग मित्रांच्या सहवासात काही जुन्या गमती जमतींना उजाळा द्याल. प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या रोमँटीक चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ वाहन खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. प्रेम प्रकरणात नसती अाफत होईल.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : १ उद्योग व्यवसायात आपल्या कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. आज वाद टाळा.

धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : २ धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३ मनोबल उत्तम राहील. आकर्षक पेहरावात घराबाहेर पडाल. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. महत्वपूर्ण चर्चेत आपले मत परखडपणे मांडाल.

कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ५ अनावश्यक खर्चास लगाम घालून भविष्यासाठी गुंतवणूक करण्याकडे आज तुमचा कल राहील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेजच्या नोकरीच्या संधी येतील.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल. दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील.
X
COMMENT