आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 18 नोव्हेंबर 2019 रोजी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : नारिंगी | अंक : १

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

  • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक  नुकसान सोसावे  लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. 

  • मिथुन : शुभ रंग : अबोली | अंक : ६

आज  रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच  गैरसमज  पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.     

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : २

आवक मनाजोगती असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील.                                                                                                

  • सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ५

टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.

  • कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ८

मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग  मित्र हिताचे सल्ले देतील. वैवाहीक जिवनात मधुरता राहील. संततीकडून सुवार्ता.

  • तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. 

  • वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

शासकिय कामे रखडणार आहेत. नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.गृहीणींचा देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.                         

  • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

नवीनच झालेल्या  ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.  

  • मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत. 

  • कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ६

आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.  

  • मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील. 

बातम्या आणखी आहेत...