आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunday 2 February 2020 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

रविवार 2 फेब्रुवारी 2020 रोजी भरणी नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : २

आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी  खर्च कराल.अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. रिकामटेकडी चर्चा आज फक्त वादास निमंत्रण देईल. संयम ठेवा.

  • वृषभ:शुभ रंग : भगवा | अंक : ४

आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. एखादी सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे तुमचा कल असेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या.

  • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : १

दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणतील. दूरावलेल्या नात्यांतील काही गैरसमज दूर होतील.

  • कर्क : शुभ रंग : तांबडा | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल. 

  • सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.स्वावलंबन महत्वाचे राहील. आज नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील. दानधर्म कराल.

  • कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. 

  • तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

  • वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : २

नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

  • धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ८

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील. 

  • मकर : शुभ रंग : नारिंगी| अंक : ९

कौटुंबिक जिवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईचे मन दुखाऊ नका.

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

  • मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ६

काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस. बघतील.