Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

रिलिजन डेस्क | Update - Apr 21, 2019, 12:00 AM IST

रविवार राशीफळ : आज दिवसभर राहील एक शुभ आणि एक अशुभ योग, प्रत्येक कामाचे तिप्पट फळ देणारा शुभ योग, चंद्र जाणार मंगळाच्या

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  रविवार 21 एप्रिलला दिवसभर एक शुभ आणि एक अशुभ योग राहील. दिवसाची सुरुवात विशाखा नक्षत्र आणि व्यतिपात नावाच्या अशुभ आणि त्रिपुष्कर नावाच्या शुभ योगामध्ये होईल. त्रिपुष्कर योगाविषयी ज्योतिषी ग्रंथामध्ये अशी मान्यता आहे की, या योगामध्ये करण्यात आलेल्या कामाचे तिप्पट फळ प्राप्त होते. चंद्र तूळ राशीमध्ये राहील, सकाळी 11 नंतर वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, रविवारचे दोन योग 12 राशींवर कसा टाकणार प्रभाव.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष : स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही हे लक्षात घ्या. आज स्वावलंबनानेच कामे होतील. तुमच्या कार्यनिष्ठेने आज वरिष्ठ प्रभावित होणार आहेत.  शुभ रंग : केशरी|अंक : ३ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : कोणतीच गोष्ट सहज साध्य होणार नाही. धंद्यात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमाचे तास वाढवावे लागतील. प्रचंड कामाने शारीरिक थकवा जाणवेल. शुभ रंग : मोतिया|अंक : १ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : दिवसाची सुरुवात उत्साहपूर्ण राहील. जागेच्या खरेदी- विक्रीतून अनपेक्षित लाभ होतील. कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा सहज पूर्ण करता येतील.बच्चेकंपनी खुश राहील.  शुभ रंग : जांभळा|अंक : ९ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : वास्तू व वाहन खरेदीसाठी केलेले कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. काही आदरणीय आप्तेष्ट मोलाचे सल्ले देतील. आज प्रेमप्रकरणांत वेळ वाया घालवू नका. शुभ रंग : मरून|अंक : ३ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : नवकवींची लिखाणे प्रसिद्ध होतील. प्रवासात महत्त्वपूर्ण ओळखी होतील. पूर्वीचे गैरसमज विसरून शेजारी जवळ येतील. ज्येष्ठ मंडळींना मुलांकडून सुवार्ता येतील.  शुभ रंग : पांढरा | अंक : २ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : आवक चांगली असल्याने पैशाअभावी रखडलेले काही उपक्रम पुढे रेटता येतील. आज जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ ठेवून आपला स्वार्थ साधून घेणे गरजेचे. शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : आज स्वत:चेच न चालवता इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. मौजमजा करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : गाठीशी असलेल्या पैशाची भविष्यकाळाच्या दृष्टीने योग्य गुंतवणूक कराल. कंजूषपणा न करता सहकुटुंब करमणुकीसाठी सढळहस्ते खर्च कराल. प्रवास होतील. शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू : अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. मित्रमंडळी तुमचा हेवा करतील. शुभ रंग : निळा | अंक : ६ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : कार्यक्षेत्रात काहीसा मानसिक तणाव जाणवेल. काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करणार आहेत. तुम्हाला जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : आज नि:स्वार्थीपणे काही कंटाळवाणी कामेही करावी लागणार आहेत. आवक पुरेशी असली तरही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील.  शुभ रंग : मोतिया | अंक : ८ 

 • sunday 21 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : आर्थिक अंदाज कोलमडणार आहेत. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायचा मोह अंगाशी येईल. प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. प्रलोभनांपासून जपायला हवे. शुभ रंग : पिवळा | अंक : ९ 

Trending