आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

आजची ग्रहस्थिती काही लोकांसाठी ठीक नाही कारण आज व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे, या 5 राशीच्या लोकांना आज अडचणींस सामोरे जावे लागू शकते

रिलिजन डेस्क

Sep 22,2019 12:10:00 AM IST

रविवार, 22 सप्टेंबर रोजी मृग नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५ आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारीच मदतीस येतील.वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ६ राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २ कार्यक्षेत्रात अनुकूल घटनांनी आत्मविश्वास वाढेल. ज्येष्ठ मंडळींची प्रकृती ठणठणीत राहील. महत्वाचे निर्णय विचारांती घ्या. हट्टीपणास आवर घाला.कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ घरातील वडीलधाऱ्यांच्या विचाराने वागलेले हिताचे ठरेल. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपुन वापरावी. केवळ मोठेपणासाठी खर्च करणे टाळा. वाद नकोत.सिंह : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १ नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. विवाहेच्छूकांना आशेचा किरण दिसेल. आप्तस्वकीय तुमच्या प्रभावात असतीलकन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ७ नोकरीच्या ठीकाणी अधिकार योग चालून येतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ८ नोकारी व्यवसायात थोड्याफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. आज उपासनेची प्रचिती येईल.वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ६ कार्यक्षेत्रात काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात.आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करुच नका.धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ४ आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील.महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे राहील.आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ५ दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. मुलांसाठी वस्त्रखरेदी कराल. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस.मीन : शुभ रंग : लेमन| अंक : ३ शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५ आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारीच मदतीस येतील.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ६ राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २ कार्यक्षेत्रात अनुकूल घटनांनी आत्मविश्वास वाढेल. ज्येष्ठ मंडळींची प्रकृती ठणठणीत राहील. महत्वाचे निर्णय विचारांती घ्या. हट्टीपणास आवर घाला.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ घरातील वडीलधाऱ्यांच्या विचाराने वागलेले हिताचे ठरेल. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपुन वापरावी. केवळ मोठेपणासाठी खर्च करणे टाळा. वाद नकोत.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १ नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. विवाहेच्छूकांना आशेचा किरण दिसेल. आप्तस्वकीय तुमच्या प्रभावात असतील

कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ७ नोकरीच्या ठीकाणी अधिकार योग चालून येतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ८ नोकारी व्यवसायात थोड्याफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. आज उपासनेची प्रचिती येईल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ६ कार्यक्षेत्रात काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात.आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करुच नका.

धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ४ आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील.महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे राहील.आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ५ दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. मुलांसाठी वस्त्रखरेदी कराल. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस.

मीन : शुभ रंग : लेमन| अंक : ३ शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.
X
COMMENT