आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 24 नोव्हेंबर रोजी चित्रा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर रविवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

  • मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : २

व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.जोडीदाराशी सामंजस्य राहील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत.

  • वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ६

दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ  मिळेल.

  • मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात. 

  • कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुले अज्ञाधारकपणे वागतील. प्रेमवीरांनी मात्र आज तू नही तो और सही हेच धोरण ठेवावे.                                           

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. 

  • कन्या : शुभ रंग : निळा | अंक : १

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. 

  • तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ४

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. 

  • वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ३

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ  आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील.  पत्नीच्याही लहरी सांभाळाल. 

  • धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर एखादी चांगली बातमी येईल. आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत वरीष्ठांचे दडपण जाणवेल. कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे.  

  • कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ५

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : २

आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही. कुणालाही मोफत सल्लेवाटप करू नका. आज फक्त आपल्या ताटात बघुन जेवा. 

बातम्या आणखी आहेत...