Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

रिलिजन डेस्क | Update - Apr 28, 2019, 12:00 AM IST

रविवारचे राशीफळ : आज शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सुटीचा दिवस, फायद

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  रविवार, 28 एप्रिलला चैत्र मासातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. आज धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे रविवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  मेष: बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या वाहनाच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत. शुभ रंग : पांढरा | अंक : १

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळीं बरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे. शुभ रंग : हिरवा  | अंक : ९     

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा. शुभ रंग : पिवळा | अंक : ७

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  कर्क : आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.  शुभ रंग : पांढरा | अंक : ८

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  सिंह : आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ 

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  कन्या : नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे. शुभ रंग : भगवा | अंक : ६

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  तूळ : कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शुभ रंग : जांभळा| अंक : २

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : आर्थिक बाजू उत्तम असेल. आज घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.  मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल.वाहनाचीही काळजी  घ्यावी लागेल. शुभ रंग : मोतिया| अंक : ९  

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  धनू : काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील.  शुभ रंग : चंदेरी| अंक : ५

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  मकर : पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल. शुभ रंग : क्रिम | अंक : १

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : हट्टीपणास लगाम घाला. इतरांचे विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. आज तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४

 • Sunday 28 april 2019 daily horoscope in marathi

  मीन : आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ 

Trending