रविवारचे राशिफळ / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

आजची ग्रह स्थिती आणि वृद्धी नावाच्या शुभ योगामुळे 12 पैकी या सात राशीच्या लोकासांठी दिवस राहील खास, होऊ शकतो विशेष लाभ

रिलिजन डेस्क

Jul 28,2019 12:05:00 AM IST

रविवार 28 जुलैला रोहिणी नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो. आजच्या ग्रह स्थितीमुळे सर्व ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मुद्दयावर अडून राहता येईल.वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ६ आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : २ बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९ प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ८ उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल.तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नकाे.वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ४ अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.कुंभ : शुभ रंग : नारिंगी| अंक : २ कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ४ काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मुद्दयावर अडून राहता येईल.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ६ आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : २ बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९ प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.

कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ८ उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल.

तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नकाे.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ४ अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी| अंक : २ कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ४ काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.
X
COMMENT