आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

रविवार 29 डिसेंबर रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : १

नोकरदारांना आज दडपणाखाली काम करावे लागेल. नोकरीच्या ठीकाणी फक्त आपल्या वाटयाचे काम करा.कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.

  • वृषभ: शुभ रंग : हिरवा | अंक : ७

नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी. शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

  • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. 

  • कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.                        

  • सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ९

आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. 

  • कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

अाज वैवाहीक जिवनात मधुरता राहील. घरात अधुनिक सुखसुविधांसाठी हौशीने खर्च कराल.नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील. 

  • तूळ: शुभ रंग : आकाशी | अंक : ७

आज  रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच  गैरसमज  पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

  • वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : १

नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक  नुकसान सोसावे  लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. 

  • धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ४

आवक समाधानकारक असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील.

  • मकर : शुभ रंग : लाल | अंक : २

मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग  मित्र हिताचे सल्ले देतील. आज जोडीदाराशी संगनमत राहील. 

  • कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागेल. वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. 

  • मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ५

मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. उद्योग व्यवसायात यश दृष्टीक्षेपात येईल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. छान दिवस.

बातम्या आणखी आहेत...