Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 07, 2019, 12:00 AM IST

रविवारचे राशिफळ : शुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे कुंभसहित या 6 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास...

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  रविवार 7 एप्रिल 2019 रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे जुळून येथे आहे सर्वार्थसिद्धी नावाचा एक खास योग. यासोबतच आज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शुभ योगांच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या दोन शुभ योगामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. फायद्याचे सौदे आणि गुंतवणूक होईल. या व्यतिरिक्त पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : नोकरी उद्योगात मेहनतीचे फळ मिळेल. सामाजिक कार्य करणाऱ्यांना मात्र अहंकार गुंडाळून ठेवावा लागेल. तुमची मते इतरांना पटतीलच असे नाही.  शुभ रंग : केशरी  | अंक : १

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : बेरोजगारांनी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे. तरूण वर्गाने नशिबापेक्षा प्रयत्नांवर विश्वास ठेऊन पावले उचलावीत. प्रवासात तब्येत सांभाळा.  शुभ रंग: पिवळा|अंक:४ 

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : आज तुमच्यासाठी ईच्छापूर्तीचा दिवस असून आज पात्रतेपेक्षा काहीतरी जास्तच पदरात पडेल. काही कारणाने दूरावलेले मित्र जवळ येतील. छान दिवस.   शुभ रंग : हिरवा | अंक : ५

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : व्यवसायात यशाची चढती कमान राहणार आहे. पूर्वीचे परिश्रम कारणी लागणार आहेत. रिकमटेकड्या गप्पांमधे  स्वत:ला गुंतवू नका. कर्तव्यास प्राधान्य द्या.  शुभ रंग : क्रिम | अंक : ३

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : कार्यक्षेत्रात महत्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर स्वप्नरंजपापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य गरजेचे राहील. दैव तुमच्याच बाजूने आहे. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.  शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ 

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहीक जिवनांत किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरु नका. सासूरवाडीकडून काही लाभ संभवतो.   शुभ रंग : पांढरा | अंक : ७

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : कारण नसताना इतराच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे. आज प्रवासात खोळंबा संभवतो. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : कोणत्याही स्पर्धत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न रहाता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. मामा मावशी कडून काही महत्वच्या बातम्या येतील.  शुभ रंग : भगवा | अंक : ३

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल.  तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शुभ रंग : मोतिया | अंक : ८

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : जागेसंबंधीत महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील.वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसौख्य लाभेल. शुभ रंग : मरून  | अंक : ९

 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. सामाजिक  कामे करणाऱ्यांना लोकांचा आदर मिळेल. शुभ रंग : डाळिंबी  | अंक : २
   
 • Sunday 7 April 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : तुमची पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. यशदायी दिवस.  शुभ रंग : चंदेरी  | अंक : ७

Trending