आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

रविवार, 08 डिसेंबर रोजी अश्विनी नक्षत्रामुळे वरियान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती आहे. या दुर्लभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • मेष: शुभ रंग : निळा | अंक : १

व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल. सम व्यावसायिक मंडळींना कमजोर समजू नका. काही नवे डावपेच लढवावे लागतील. अविश्रांत श्रम गरजेचे आहेत.

 • वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ६

आजच झालेल्या नव्या ओळखींवर चुकूनही विश्वास ठेऊ नका. हाती असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे. रात्रीच्या प्रवसात सतर्क रहावे. मौल्यवान सांभाळा.

 • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ७

बऱ्याच दिवसांपासूनची काही अपूरी स्वप्ने साकार होऊ शकतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज शुभ चिंता, जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणणार आहे.

 • कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

आज तुम्ही विचारांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. काही जुनी तत्व गुंडाळून ठेवून लवचिक धोरण स्विकाराल.आज अनावश्यक बोलण्यावर ताबा ठेवाल तर बरे.         

 • सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

आज सहजच काही साध्य होईल या भ्रमात राहू नका. सरकारी कामात विलंब ठरलेलाच आहे. घरात वडीलधाऱ्यांचेही मूड सांभाळावे लागतील.

 • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा. वैवाहीक जिवनांत चालंलंय ते बरं चालंलंय. जोडीदाराच्या चुका काढण्याचा प्रयत्न नको.                      

 • तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : १

अत्यंत उत्साही व आनंदी दिवस. तुमच्या महत्वाकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. गृहलक्ष्मी हसतमुख राहील.

 • वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वृध्दी होईल. तुम्ही जीव ओतून काम कराल. रिकामटेकड्या वादविवादात मात्र तटस्थ रहा. मित्रांना उद्याच यायला सांगा.    

 • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

तुमच्या प्रभावी वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर प्रभाव पडेल. आज तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

 • मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

फक्त कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. मातोश्रींकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे फाजिल लाड बंद करावे लागतील.

 • कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

घराबाहेर वावरताना तापट स्वभाव काबूत ठेवावा.आपली मते इतरांवर लादून चालणार नाहीत. अती दगदग, धावपळ झाल्याने प्रकृती जरा नरमच राहील.

 • मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : २

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. नवे हितसंबंध जोडले जातील.  दिवस अनुकूल असल्याने आजचे काम उद्यावर ढकलू नका. 

बातम्या आणखी आहेत...