Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रिलिजन डेस्क | Update - Dec 09, 2018, 12:00 AM IST

वृषभ राशीच्या लोकांना रविवार वादापासून दूर राहण्याचा सल्ला, मिथुन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा दिवस तर कर्क राश

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  रविवार 9 डिसेंबरला मूळ नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा प्रभाव 7 राशींवर राहील. या योगाच्या प्रभावामुळे कुटुंब आणि स्वतःसाठी काही लोक वेळ काढू शकणार नाहीत. अशुभ योगामुळे वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्च होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत आणि वेळ वाया जाईल. अशाप्रकारे डिसेंबरमधील हा रविवार 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी ठीक राहणार नाही.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणत्या राशीसाठी कसा राहील महिन्यातील हा रविवार...

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  मेष - निंदकाचे घर असावे शेजारी हे लक्षात घ्या. गोडबोल्या मंडळींच्या फार नादी लागू नका. हितशत्रू मित्रांमधेच लपले असण्याची शक्यता आहे. गैरमार्ग टाळाच. शुभ रंग : केशरी, अंक-७. 

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  वृषभ - आज स्थावराच्या संदर्भातील महत्वाचे व्यवहार टाळलेत तर बरे होईल. आज घराबाहेर वावरताना संयम अत्यंत महत्वाचा राहील. वादविवादात तटस्थ रहा. शुभ रंग : जांभळा, अंक-७.

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  मिथुन - उच्च प्रतिचा आत्मविश्वास व मनोबल असलेला दिवस. आज महत्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. एखादा विवाह जुळवण्यात तुम्ही मध्यस्ती कराल.  शुभ रंग: आकाशी, अंक-९. 

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  कर्क - धनप्राप्ती मनाजोगती असली तरी तुम्हाला आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. अपचनाचे विकार संभवतात. खाण्यापिण्यावर ताबा ठेवणे आवश्यक. शुभ रंग: निळा, अंक-५.

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  सिंह - आज या ना त्या मार्गने पैसा येईल. स्वास्थ्यविषयक तक्रारी दूर होतील. आलेल्या शुभवार्तांमुळे मूड छान राहील. अती स्पष्ट बोलून कुणाचे मन दुखाऊ नका. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक, -६

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  कन्या - दैनंदीन कामे कंटाळवाणी वाटतील. आज आपण जास्तीतजास्त वेळ कुटुंबासाठी देवून मुलांचे जिव्हाळयाचे प्रश्न साेडवण्यास प्राधान्य देणार आहात. शुभ रंग: आकाशी, अंक- २.

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  तूळ - अडचणीच्या प्रसंगी शेजारी मदतीचा हात पुढे करतील. आज आपला खोडकर स्वभाव काबूत ठेवणे गरजचे आहे. अती थट्टा मस्करीने काही मने दुखावतील. शुभ रंग : अबोली, अंक-३. 

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  वृश्चिक - नव्याने सुरु केलेल्या योजना गतीमान होतील. व्यवसायांत भागिदारांची उत्तम साथ लाभेल. राजकारणी दिलेली वचने पाळू शकतील. पूर्ण अनुकूल दिवस. शुभ रंग : क्रिम, अंक-१.

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  धनू - आवक बऱ्यापैकी असली तरी योग्य आर्थिक नियोजनही गरजेचे आहे. तरुणांनी मर्यादा पाळाव्यात. एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधल्यास सापडेल. शुभ रंग : हिरवा, अंक-४. 

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  मकर - कार्यक्षेत्रातील उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी धावपळ वाढेल. शािररीक थकवा जाणवेल. क्षुल्लक कारणाने जोडीदाराशी मतभेद राहतील. कमीच बोला. शुभ रंग: क्रिम, अंक-८.  

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  कुंभ - आज आपल्या ईच्छापूर्तीच्या दिवसाचा पुरेपूर लाभ घ्या. प्रामाणिक प्रयत्नांना सकारात्मकतेची जोड दिलीत तर अनेक बिकट प्रश्न सोपे होवू शकतील. शुभ रंग : भगवा, अंक- ४.

 • aajache rashibhavishya Sunday 9 December 2018 daily horoscope in marathi

  मीन - आपल्या अविश्रांत प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. अनेक प्रांतात वर्चस्व सिध्द करता येईल. अधिकार वापरण्याची संधी वाया घालवू नका. प्रतिष्ठेस जपा.  शुभ रंग : तांबडा, अंक, -२

Trending