Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

दिव्य मराठी वेब,chrysanthemum.jpg | Update - Jun 09, 2019, 12:05 AM IST

रविवार राशिफळ : हर्षण नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, काही लोकांचा अडकलेला पैसा आज परत मिळू शकतो तर काहींसाठी लाभाचा राहील दिवस...

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  रविवार 9 जून रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : अबोली | अंक : ५   
  ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, परंतू आज पत्नीचा सल्ला डावलू नका.

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  कर्क :  शुभ रंग : निळा | अंक : ५
  आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.  

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १
  रिकामटेकडया चर्चा टाळा कारण त्यातून निष्पंन्न काहीच होणार नाही. आज शेजारी अडचणीत मदत करायला धावून येतील. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शक्यताे.  

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : पिवळा | अंक : ४
  आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
  आज तुम्ही मित्रमंडळींत आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस. 

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : ९                                      आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.   

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
  व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार  टाळून  हितसंबंध  जपणे  गरजेचे आहे.  

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
  नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे. 

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : २
  भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे  गरजेचे आहे. गृहीणींना  माहेरची ओढ लागेल.  

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
  व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या. 

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
  थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनाला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील. 

 • sunday 9 june 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : केशरी | अंक : ७ 
  प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर  होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. गर्भवतींना  सुदृढ संततीचा लाभ होईल. कलाकारांचे कौतुक होईल.  

Trending