आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करायचे विवाहित सुनील शेट्टी, पण कधीही देऊ शकले नाहीत प्रेमाची कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेते सुनील शेट्टी 57 वर्षांचे होणार आहेत. 11 ऑगस्ट 1961 रोजी मुल्कि, कर्नाटक येथे जन्मलेल्या सुनील शेट्टी यांनी 1992 मध्ये 'बलवान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या सुनील शेट्टी लाइमलाइटपासून दूर आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा प्रेक्षक त्यांचे अॅक्शन चित्रपट डोक्यावर घ्यायचे. आपल्या अॅक्शन आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध सुनील कधीही लव्हर बॉय वाटले नाहीत. पण एकेकाळी ते सोनाली बेंद्रेच्या प्रेमात पडले होते. 


या कारणामुळे कधीही देऊ शकले नाहीत आपल्या प्रेमाची कबुली...

90 च्या दशकात सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांची जोडी पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण खसागी आयुष्यात सुनील कधीही सोनालीजवळ आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकले नाहीत. दोघांनी एकत्र टक्कर (1995), सपूत (1996) आणि कहर (1997) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. सुनील शेट्टी सोनालीवर एकतर्फी प्रेम करु लागले होते. पण त्याकाळात ते विवाहित होते आणि आपल्या पत्नीला ते दगा देऊ इच्छित नव्हते. या कारणामुळे त्यांनी सोनालीजवळ कधीही आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली नाही. सुनील शेट्टीचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की जर त्याकाळात सुनील शेट्टी विवाहित नसते, तर त्यांनी सोनाली बेंद्रेसोबत नक्की लग्न केले असते.

 

कॅन्सरशी लढा देत असलेल्या सोनालीची वाढवली हिंमत...

सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत असून येथे ती कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिला हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाले आहे. जेव्हा सुनील शेट्टी यांना सोनालीच्या आजाराविषयी समजले तेव्हा त्यांनी तिची हिंमत वाढवण्यासाठी लिहिले, सोनालीसाठी स्ट्रेंथ, पावर, प्रेम आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. ती सध्या ज्या कठीण परिस्थितीला सामोरे जातेय, तितक्याच कठीण परिस्थितीचा सामना तिचा मुलगा आणि पती गोल्डी करत आहेत. या संपूर्ण कुटुंबाला स्ट्रेंथची गरज आहे.' सुनील यांनी पुढे लिहिले, 'हा एक असा आजार आहे, यामध्ये जर तुम्ही स्ट्राँग राहिलात आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची साथ मिळाली तर त्यातून लवकर बाहेर पडणे सोपे जाते.'

 

लग्नात पत्नी मानाला गिफ्ट केली होती BMW कार...

सुनील शेट्टी यांनी 1991 मध्ये माना कादरीसोबत लग्न केले होते. लग्नात त्यांनी पत्नीला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. सुनील यांनी या कारच्या मागे बीएमडब्ल्यूला डिस्क्राइब करताना लिहिले होते, 'BMW- Be My Wife'. माना कादरी गुजरातच्या एका मुस्लिम कुटुंबातून आहे. लग्नापूर्वी माना आणि सुनील यांनी नऊ वर्षे एकमेकांना डेट केले होते. 

 

या चित्रपटांमध्ये झळकले आहेत सुनील शेट्टी...
'वक्त हमारा है', 'दिलवाले', 'मोहरा', गोपी किशन, 'सपूत', बॉर्डर, कृष्णा, 'हेरा फेरी', 'धड़कन', कांटे, 'फिर हेरा फेरी' और 'मिशन इस्तांबुल', 'जय हो', 'कोयलांचल', 'देसी कट्टे' यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सुनील यांनी काम केले आहे. आता ते त्यांच्या हॉटेल व्यवसायात बिझी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...