आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : लवकरच एक नवी मालिका भेटीला येणार आहे. मालिकेचे नाव आहे ‘सहकुटुंब सहपरिवार’. मालिकेच्या नावाप्रमाणेच ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. सुनील बर्वे आणि नंदिता धुरी या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सरिता आणि सत्यजीत असे त्यांच्या पात्राचे नाव असून कुटुंबाच्या सुखासाठी त्यांनी केलेला त्याग हा मालिकेचा महत्त्वाचा दुवा आहे.
या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना सुनील बर्वे म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबतची ही माझी तिसरी मालिका. याआधी 'बे दुणे दहा' आणि 'लेक माझी लाडकी' या स्टार प्रवाहाच्या मालिकांमध्ये वेगळी भूमिका साकारली होती. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमध्ये सत्यजीत ही भूमिका साकारतो आहे. अतिशय विनम्र आणि मवाळ असे हे पात्र आहे. आताच्या घडीला बरेच जण विभक्त कुटुंबाकडे वळत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व पटवून देणारी ही मालिका आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.