आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावस्करने पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यास जाण्यास नकार दिला आहे. तर सिद्धूला मात्र पाकिस्तानचा व्हिसा मिळाला असून तो पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे.
सुनील गावस्कर, कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह बॉलिवूड स्टार आमीर खानलाही इम्रान यांच्या पक्षाच्या वतीने शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते. सुनील गावस्कर आणि कपिलने मात्र सोहळ्यास जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील गावस्करने तर याबाबत फोनवर इम्रान यांना कळविलेदेखिल आहे. कपिल आणि सुनील गावस्कर यांनी त्यांची आधीची नियोजित इतर कामे असल्याने शपथविधी सोहळ्याला जाणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. सुनील गावस्कर या काळात इंग्लंडमध्ये असणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.
पंजाबमध्ये सध्या इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनी शपथविधी सोहळ्यात जाण्यास नकार दिला असला तरी, सिद्धू शपथविधीसाठी पाकला जाण्याची शक्यता आहे. सिद्धूने या सोहळ्यात जाण्यासाठी पंजाब आणि केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सिद्धूच्या जाण्याबाबत काहीही आक्षेप नसल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाला राजकीय महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
फायदा तोटा दोन्हीची शक्यता
सिद्धू शपथविधीसाठी पाकिस्तानात गेल्यास त्यांना फायदा आणि तोटा दोन्हींसाठी सज्ज राहावे लागणार आहे. पाकिस्तानात गेले आणि त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर आपल्या शैलीने ते अनेकांची मने जिंकू शकतात. तसेच इम्रान त्यांचे मित्र असल्याने आगामी काळात सिद्धू यांचे महत्त्व हा दौरा झाल्यास वाढू शकते. पण त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा संस्थांच्या नजरा सिद्धूंवर असतील. तसेच पाक मीडियासमोर बोलताना सिद्धूला सांभाळून बोलावे लागेले. आधीच सिद्धू यांच्या या दौऱ्याला विरोध होत आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे त्याची प्रतिमा नकारात्मकही बनू शकते.
सुखबीर म्हणाले, पाकले गेले तर तिथेच राहा
शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी सिद्धूवर टीका केली. सिद्धू पाकला गेले तर तिथेच राहणे योग्य ठरेल असे ते म्हणाले. त्यांनी असे केल्यास पंजापमध्ये आणि देशातही शांतता राहील असेही बादल म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.