आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 एपिसोड्सनंतरच बंद झाला सुनील ग्रोवरचा शो 'कानपुर वाले खुराना', स्वतः सुनीलने केला खुलासा, शो बंद होण्यामागचे कारणही सांगितले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कॉमेडियन सुनील ग्रोवरचा शो 'कानपुर वाले खुरानाज' बंद झाला आहे. स्वतः सुनीलने एका इंटरव्यूमध्ये याबाबतीत खुलासा केला आहे. सोबतच त्याने यामागचे कारणही पब्लिकली शेयर केले. सुनील इंटरव्यूमध्ये म्हणाला, "हा शो माझ्यामुळेच बंद होत आहे. मी याला 8 एपिसोड्ससाठीच साइन केले होते. याचे एक कारण हेही आहे की मी पुढच्या तारखा आधीच फिल्म 'भारत'ला दिलेल्या आहेत". सुनील हेदेखील म्हणाला की, त्याने प्रेस कॉन्फ्रेंस आणि इंटरव्यूजमध्ये हे आधीच क्लियर केले होते की तो या शोला केवळ इतकाच वेळ देऊ शकतो. 

 

सुनीलने सांगितले का इतक्या कमी वेळेसाठी तो या शोमध्ये आला... 
सुनीलने बातचीतीमध्ये सांगितले की अनेक स्टार्स 'भारत' चे प्रमोशन करण्यासाठी काही अगोदर आले, पण तो सर्वात नंतर आला. सुनील म्हणाला, "माझ्याकडे एक महिन्याचा वेळ होता. त्यामुळे एवढ्याच ड्यूरेशनचा शो साइन करण्याचा निर्णय घेतला. माझ्या फिल्मची शूटिंग सुमारे एक महिना चालणार आहे". गुरुवारी सुनील ग्रोवरने 'भारत' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 

 

13 डिसेंबरला सुरु झाला होता सुनील ग्रोवरचा शो... 
सुनील ग्रोवरचा शो 'कानपुर वाले खुरानाज' 15 डिसेंबर 2018 पासून ऑनएयर झाला होता. शोमध्ये सुनीलव्यतिरिक्त अली असगर, सुगंधा मिश्रा आणि उपासना सिंहसुद्धा दिसले होते. तसेच फराह खान शोमध्ये सुनीलची सेलेब्रिटी शेजारीणच्या रोलमध्ये होती. मात्र, कधीच हा शो TRP चार्टमध्ये आपली जागा बनवू शकला नाही. 

 

काही दिवसांपूर्वीच फराह खान नाराज झाल्याचे कळले होते... 
सूत्रांनुसार कळाले होते की, फराह खान शोच्या टीमसोबत खुश नाही. ती टीमच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे परेशान होती. सूत्रांनी सांगितले की, फराह खानला शूटिंगच्या सेटवर 4-5 तास वाट पाहावी लागायची. यामुळे तिचे पर्सनल लाइफ डिस्टर्ब होत होते. तिच्या मुलांनाही घरी तिची खूप वाट पाहावी लागायची. 

बातम्या आणखी आहेत...