आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या हाती दंडुका आहे, तो वापरण्याची वेळ आणू नका, मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना आयुक्त केंद्रेकरांची तंबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अधिकाऱ्यांमध्ये मला सध्या मरगळ दिसते. दुष्काळात यंत्रणा त्वरेने हलली पाहिजे, तसे होत नाही. दुष्काळ ही संधी आहे, त्याचे सोने झाले पाहिजे. तसे न झाल्यास माझ्या हाती दंडुका आहे, हे विसरू नका. तो वापरण्याची इच्छा नाही, पण ती वेळही येऊ देऊ नका, अशा शब्दांत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना लेखी संदेश पाठवून तंबी दिली.  लागेल ती मदत मिळेल, कामे दिसली पाहिजेत. काय कामे होताहेत हे नागरिकांनी मला सांगितले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. 


चारा छावणी, जनावरांची मर्यादा ३ हजारांवर
केंद्रेकर यांनी चारा छावणीतील जनावरांची मर्यादा वाढवून आणली आहे. आता एका छावणीत ३ हजार जनावरे ठेवता येतील. छावण्यांची संख्या वाढली तर ताण वाढतो. एकाच ठिकाणी जास्त जनावरे असली तर ताण कमी होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...