आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील शेट्टीची राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड; डोपिंग संपवण्यासाठी अभिनेत्याची प्रसिद्धी प्रभावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (एनएडीए-नाडा) चे ब्रँड एम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली. मंगळवारी एजन्सीने याबाबत घोषणा केली. खेळांतून डोपिंग संपवण्यासाठी सुनील शेट्टीचे सेलिब्रिटी स्टेटस उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा एनएडीएने व्यक्त केली आहे. यावर्षी 150 पेक्षा अधिक अॅथलिट्स डोप टेस्टमध्ये फेल


देशभरात यावर्षी 150 हून अधिक अॅथलिट्स डोप टेस्टमध्ये फेल झाले आहेत. यामध्ये एक तृतीयांशपेक्षा अधिक बॉडी बिल्डर्स आहेत. दरम्यान टोकियो ऑलिम्पिकसाठी 8 महिने शिल्लक असताना खेळाडूंचे डोप टेस्टमध्ये फेल होणे चांगले संकेत नाहीत. यावर्षीच्या सुरुवातीला वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीद्वारे (डब्लूएडीए-वाडा)एनएडीएला सस्पेंड करण्यात आले होते. त्यामुळे एनएडीएने अॅथलिट्सचे घेतलेल्या नमुन्यांची देशाबाहेर तपासणी केली जाणार आहे. सुनील शेट्टीची लोकप्रियता परिणामकारक ठरेल


एनएडीएचे महासंचालक नवीन अग्रवाल यांच्या मते, माजी खेळाडूपेक्षा अभिनेता सुनील शेट्टीची लोकप्रियता याप्रकरणात अधिक परिणामकारक ठरेल. ते म्हणाले की, "डोपिंग केवळ आपल्यासाठीच नाही तर देशासाठी नुकसानदायी असल्याचा संदेश देण्यात अभिनेता सुनील शेट्टी यशस्वी होईल असे आम्हाला वाटते. अभिनेता लोकांच्या अधिक जवळ पोहोचतो असा आम्हाला विश्वास आहे."
 

बातम्या आणखी आहेत...