आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या 'अन्ना'चे खंड्याळ्यात आहे आलिशान घर, पाहा डोळे दिपवणा-या आशियानाचे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडमध्ये 'अन्ना' नावाने प्रसिद्ध असेलला अभिनेता सुनील शेट्टी यांनी मुंबईजवळील खंडाळा येथे आपले स्वप्नातील घर साकारले आहे. त्यांच्या या हॉलीडे होममध्ये सर्व चैनीच्या वस्तू उपलब्ध आहेत. सुनील शेट्टी यांचे हे दुसरे घर आहे. चोहोबाजुंनी पसरलेली हिरवीगार पालवी, बौद्ध प्रतिमा आणि त्यांचे लाडके पप्पीज त्यांच्या हॉलीडे होमची शोभा वाढवतात. सुनील आपल्या या घरी अनेकदा शानदार पार्टींचेही आयोजन करत असतात.

 

मुंबईपासून जवळपास 2 तासांच्या अंतरावर खंडाळ्यात हे लग्झरी होम आहे. डिस्कव्हरी प्रोजेक्टच्या अंतर्गत बनलेल्या या कम्यूनिटी प्रोजेक्ट्समध्ये 21 प्रिमिअम व्हिला आहेत. त्यातील एक व्हिला सुनील शेट्टी यांचा आहे. या व्हिलाचे बांधकाम सुनील शेट्टी यांची कंपनी S2 रिअॅलिटी अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने केले आहे. घराचे आर्किटेक्ट जॉन अब्राहमचा भाऊ एलनने केले आहे. तसेच याचे इंटेरिअर आणि फर्निचर सुनील शेट्टी यांची पत्नी मानाने केले आहे.

 

काय आहे खास? 
6200 sq ftमध्ये पसरलेल्या या लॅव्हिश व्हिलामध्ये प्रायव्हेट गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइटची लिव्हिंग रुम, 5 बेडरुम, किचन आहे. येथे लक्ष वेधणारी जागा म्हणजे डायनिंग रुम आहे, ती अगदी स्विमिंग पूलला जोडलेली आहे.


वयाची 57 वर्षे केली पूर्ण
सुनील शेट्टी यांच्या घराचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे एकेकाळी बॉलिवूडमधील सुपरस्टार पदावर विराजमान असलेल्या या अभिनेत्याने नुकतीच वयाची 57 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमधील मुल्कि येथे झाला. 1992पासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 1992 मध्ये 'बलवान' या सिनेमाद्वारे त्यांनी बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. या सिनेमानंतर सुनील यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.


'वक्त हमारा है'(1993), 'दिलवाले' (1994), 'मोहरा' (1994), 'सपूत' (1996), 'हेरा फेरी' (1999), 'धड़कन' (2000), 'फिर हेरा फेरी' (2006) आणि 'मिशन इस्तांबुल' (2008) यांसारख्या हिट सिनेमांमध्ये झळकलेले सुनील आता अभिनयापेक्षा आपले जास्त लक्ष हॉटेल बिझनेसवर केंद्रीत करत आहेत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सुनील शेट्टी आणि त्यांच्या पत्नीच्या स्वप्नातील आशियाना कसा आहे...

बातम्या आणखी आहेत...