आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sunil Shetty Shooting For His Hollywood Film, Will Be Seen In Role Of Sikh Police Officer

सुनील शेट्टीने केले आपल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग, शीख पोलिस ऑफिसरच्या रोलमध्ये दिसणार आहे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुनील शेट्टीने आपला हॉलिवूड चित्रपट 'कॉल सेंटर' चे शूटिंग सुरु केले आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन-चायनीज डायरेक्टर जेफ्री चिनच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेला हा चित्रपट सत्य घटनेवरधारीत आहे. ही कथा एका कॉल सेंटरमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यावर आधारित आहे, ज्याचे भांडेफोड एका भारतीय पोलिस ऑफिसरने केले होते.  

शीख पोलिस ऑफिसर बनला सुनील... 
सुनील शेट्टी चित्रपटात घोटाळा उघडकीस आणणाऱ्या शीख पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. ही कथा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या चार लोकांच्या अवती भोवती फिरते, प्रकरणाच्या तपासामध्ये अमेरिकन एजन्सी सामील होते, पण एक भारतीय पोलिस ऑफिसर ही केस सॉल्व करतो.  

हिंदी, तेलगुमध्येदेखील होऊ शकतो डब... 
सुनील शेट्टी या वर्षाच्या शेवटपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. चित्रपट इंग्रजी भाषेत बनत आहे. पण रिपोर्ट्सनुसार, हा हिंदी आणि तेलगुमध्येदेखील डब केले जाईल. चित्रपटात शेट्टीचे काही अॅक्शन सीनदेखील पाहायला मिळू शकतात.  

सुनील शेट्टीचे अपकमिंग प्रोजेक्ट्स... 
अशातच सुनील शेट्टीने 'पहलवान' ने कन्नड सिनेमामध्ये डेब्यू केला आहे. यामध्ये तो किच्चा सुदीपच्या गुरुच्या भूमिकेत दिसला होता. तो पुढच्यावर्षी पोंगलला रिलीज होणार असलेला रजनीकांत स्टारर तमिळ चित्रपट 'दरबार' मध्ये दिसणार आहे. मोहनलाल स्टारर मल्याळम चित्रपट 'मराक्कर : द लॉयन ऑफ अरेबियन सी' मध्येही तो दिसणार आहे. जो पुढच्यावर्षी 19 मार्चला रिलीज होऊ शकतो.  

बातम्या आणखी आहेत...