आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री सुनील तटकरेंना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी, पत्रात नमूद केले नगरच्या व्यक्तीचे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे उमेदवार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. विशेष म्हणजे या पत्रात ठार मारणाऱ्या व्यक्तीची घराच्या पत्त्यासह माहिती नमूद करण्यात आली आहे. शिरूर येथील पोस्ट ऑफिसमधून सुनील तटकरेंच्या नावाने एक पत्र म्हसळा पोस्ट ऑफिसमध्ये आलं. पत्रावर राष्ट्रवादी कार्यालय म्हसळा येथील पत्ता असल्याने हे पत्र राष्ट्रवादीच्या म्हसळा कार्यालयात पोस्ट करण्यात आले. राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाजीम हासवारे यांनी हे पत्र उघडून पाहिल्यानंतर उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.


सदर पत्रामध्ये धमकी देणाऱ्याच्या नावाचा आणि पत्त्याचाही उल्लेख आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी येथील बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची असून पूर्ववैमन्यसातून काही लोकांच्या मदतीने सुनील तटकरेंना ठार मारणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुनील तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेस आघाडीतर्फे रायगड-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेद्वार असल्याने या निनावी पत्राकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

 

पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरुन म्हसळा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुनील तटकरे यांना आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेत म्हसळा पोलिसांनी त्वरीत एक टीम तयार करुन पत्रात नमूद केलेल्या ठिकाणी रवाना केली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा... सदर पत्र

बातम्या आणखी आहेत...