आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sunny Demanded Rs 5 Crore Fee After Becoming MP, That's Why Makers Changed The Actor

खासदार झाल्यानंतर सनीने मागितले ५ कोटी, तर निर्मात्यांनी नायकच बदलला, 23 वर्षांनंतर सोबत काम करणार होते राजकुमार आणि सनी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : सनी देओलने खासदार झाल्यानंतर चित्रपटांसाठी आपल्या मानधनामध्ये वाढ केली आहे. नुकताच त्याला 'फतेह सिंह' चित्रपट ऑफर करण्यात आला आणि त्यासाठी त्याने निर्मात्यांकडे ५ कोटींची मागणीही केली. मात्र, निर्मात्यांना ही रक्कम बजेटपेक्षा जास्त वाटली तेव्हा त्यांनी या चित्रपटासाठी सनीऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, एका दाक्षिणात्य नायकाला यात घेणार असल्याची चर्चा आहे. 

 

18 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट झाले निश्चित... 
असे म्हटले जात आहे की, निर्माते या चित्रपटासाठी १५ ते १८ कोटींपर्यंतचे बजेट लागणार असल्याचे सांगताहेत. अशा वेळी एकट्या सनीला ५ कोटी दिल्यास त्यांचे बजेट बिगडू शकत होते. या चित्रपटाच्या एका मोठ्या भागाची शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. तेथूनच अनेक कलावंतांची निवडही केली जाणार आहे. सोबतच चित्रपटामध्ये व्हीएफएक्सचे कामही करायचे बाकी आहे. त्यामुळे सनीऐवजी दुसऱ्याला घेऊन चित्रपट बनवण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे.  

 

स्थलांतर करणाऱ्या युवकांची कथा...  
या चित्रपटाची कथा पंजाबहून लंडनला स्थलांतर करणाऱ्या युवकांसंदर्भात आहे. कथेमध्ये नायक पंजाबहून निघून लंडनला पोहोचतो आणि तिथे बॉम्ब डिफ्यूज करणाऱ्या दलामध्ये काम करायला लागतो. चित्रपटात फुटीरवादी संघटनेच्या कारवायादेखील दाखवण्यात येतील. 

 

संबंध सुधारण्याचा केला होता प्रयत्न...  
राजकुमार संतोषी यांनी २३ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये सनीसोबत 'घातक'मध्ये काम केले होते. यानंतर २००२ मध्ये भगतसिंगांवर आधारित दोघांच्या वेगवेगळ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. तेव्हापासूनच त्यांचे संबंध बिघडल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून ते सनीसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत होते. तथापि, त्यांची ही इच्छा सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाही.