आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्याकडे ऐतिहासिक विषयांवर आधारित अनेक स्क्रिप्ट्स - सनी देओल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकताच रिलीज झालेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर यशराज फिल्म्स महान राजपूत योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्यावर चित्रपट काढणार आहे. त्यांच्या 'ठग्स' ला चांगला प्रतिसाद मिळाला नाही, चित्रपटाने बाॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही तरीदेखील यशराज बॅनरला फरक पडला नाही. ते पृथ्वीराज चौहानवर आधारित चित्रपटावरदेखील तितकाच खर्च करणार आहेत. इतका नुकसाने झाल्यानंतरही त्यांनी आगामी चित्रपटाच्या खर्चात कटौती केली नाही. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड सुरू आहे तसेच यावरील पोशाखासाठीदेखील डिझायनर्ससोबत चर्चा सुरू आहे. मात्र, अजून कंपनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानची भूमिका करणार आहे. डॉ चंद्र प्रकाश द्विवेदी दिग्दर्शन करतील. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाविषयी खास गोष्ट म्हणजे, हा चित्रपट सात वर्षांपूर्वीच सुरू झाला असता तोही सनी देओलसोबत. याविषयी स्वत: सनी देओलने सांगितले. तो म्हणाला..., 'तेव्हा या चित्रपटाचे निर्माते मला चित्रपटात साइन करण्यासाठी अमेरिकेला आले होते. पण तेव्हा वेळ नव्हता. त्यामुळे तो प्रकल्प सुरू झालाच नाही. त्याऐवजी आम्ही डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदीच्या 'मोहल्ला अस्सी'चे शूटिंग सुरू केले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला याचा मला आनंद झाला आहे. आता याची निर्मिती आदित्य चोप्रासारखा निर्माते करत आहे आणि तेही योग्य आहे. या प्रकल्पाला मोठ्या बॅनरची गरज होती.' 


प्रामाणिकपणा माझ्यासाठी महत्त्वाचा 
पृथ्वीराज चौहान वगळता माझ्याकडे अनेक ऐतिहासिक पात्र आहेत. मात्र, मी त्या स्वभावाचा माणूस नाही, जो सध्या ट्रेंड सुरू तसाच चित्रपट घेऊन येईल. प्रामाणिकपणा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी मी खूप संशोधन केले होते. माझ्याकडे सध्या बऱ्याच ऐतिहासिक पात्रांची स्क्रिप्ट आहे, परंतु चांगला निर्माते आणि दिग्दर्शक मंडळावर येईपर्यंत मी त्यांना हात लावणार नाही. राजा अशोकविषयी मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. त्या आजही माझ्या स्मरणात आहेत..

बातम्या आणखी आहेत...