आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये 9 वेळा दिल्या शिव्या, तरीही सेन्सॉर कडून मिळाला हिरवा कंदील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई| दिर्घकाळापासून सेन्सॉर बोर्डच्या वादात अडकलेला वादग्रस्त चित्रपट 'मोहल्ला अस्सी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये वाराणसी एका वेगळ्या ठंगात दाखवण्यात आले आहे. तर ट्रेलरमध्ये कलाकार 9 वेळा शिवी देताना किंवा डबल मीनिंग बोलताना दिसत आहेत. 3 वेळा स्वतः सनी देओल शिवी देताना दिसला आहे. तर ट्रेलरच्या सुरुवातीला 'गंगा मे हमारा विश्वास अब भी अटल है' आणि "हम भारत को पिकनिक स्पॉट और गंगा को स्विमिंग पूल नही बनने देंगे" असे डायलॉग्सही आहेत. चित्रपटाचे डायरेक्शन चंद्रप्रकाश व्दिवेदी यांनी केले आहे.

 

काशीमधील अस्सीवर आधारित आहे चित्रपट 
मोहल्ला अस्सी, वाराणसीचे नामांकित साहित्यकार डॉ. काशीनाथ सिंह यांच्या 2004 मध्ये आलेल्या काशी का अस्सी या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकामध्ये रामजन्म भूमी आणि मंडल कमीशन दरम्यानच्या घटना राजकीय ठंगात लिहिण्यात आल्या आहेत. चित्रपटामध्ये सनी दिओल, साक्षी तंवरसोबतच मुकेश तिवारी, सौरभ शुक्ल आणि रवि किशन प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. 

 

वाराणसीचा पंडित बनला आहे सनी 
सनी देओल या चित्रपटामध्ये वाराणसीच्या अस्सी घाटमध्ये राहणा-या एका पंडिताच्या भूमिकेत आहे. तो संस्कृतचा शिक्षकही आहे. 11 डिसेंबर 2017 ला दिल्ली हायकोर्टने एक कट आणि 'ए' सर्टिफिकेटसोबत सीबीएफसीला चित्रपट रिलीज करण्याची ऑर्डर दिली होती. सनी हा चित्रपट 21 सप्टेंबर 2018 ला रिलीज करणार होता. पण आता हा चित्रपट 16 नोव्हेंबर 2018 ला रिलीज होणार आहे. 

 

ऑनलाइन लीक झाला आहे चित्रपट 
मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्ली कोर्ट व्दारे चित्रपटावर स्टे लावल्यानंतर हा चित्रपट इंटरनेटवर 11 ऑगस्ट 2015 ला लीक झाला होता. चित्रपटाचे डायरेक्टर आणि सनी विरुध्द वाराणसीमध्ये शिव्यांचा वापर केल्यामुळे एफआयआरही दाखल करण्यात आाल होता. 8 एप्रिल 2016 रोजी सीपीएफसीनेही हा चित्रपट बॅन केला होता. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...