आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओल, करिश्मा कपूरच्या 22 वर्षे जुन्या चेन पुलिंगच्या केसची सुनावणी, सेशन कोर्टाने केली निर्दोष मुक्तता 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 22 वर्षे जुन्या चेन पुलिंग केसमध्ये सनी देओल आणि करिश्मा कपूरला निर्दोष मुक्त केले गेले आहे. रिपोर्ट्सनुसार, जयपुरच्या एक सत्र न्यायालयाने हा निर्णय ऐकवला. जज पवन कुमारने आपल्या निर्णयात सांगितले आहे की, रेल्वे मजिस्ट्रेटने सनी आणि करिश्माला त्याच कलमांन्वये आरोपी बनवले गेले आहे, ज्या 2010 मध्ये सेशन कोर्टाने रद्द केल्या होत्या. दोघांविरुद्ध पुराव्याचा अभाव आहे, त्यामुळे आरोपातून त्यांची मुक्तता झाली.  

'बजरंग' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आहे घटना... 
करिश्मा आणि सनी देओलने 1997 मध्ये अजमेरच्या नरेना रेल्वे स्टेशनवर चित्रपट बजरंगच्या शूटिंगदरम्यान 2413-ए अपलिंक एक्सप्रेसचा इमर्जन्सी ब्रेक लावला होता. यामुळे ट्रेन सुमारे 25 मिनिटे लेट झाली होती. त्यावेळी स्टेशन मास्टर सीताराम मलाकारने चित्रपटाशी निगडित सदस्यांविरुद्ध रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली होती.