Maharashtra Special / सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी सनी देओल नागपूरात, गडकरींची भेट घेऊन संघाचे संस्थापकांच्या स्मृतींना केले अभिवादन

राजकीय आणि इतर विषयावर काळ चर्चा केल्यानंतर गडकरी व कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतले

दिव्य मराठी

Aug 14,2019 06:17:56 PM IST

नागपूर- भाजपचा खासदार होऊन राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या अभिनेता सनी देओल याने बुधवारी नागपुरातील वास्तव्यात संघाच्या रेशीमबाग येथील स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली आणि संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी त्यांच्या समवेत होते. यावेळी सनी देओल यांनी संघाच्या कामांची माहिती घेतली.


सनी देओलचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले. रात्री डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ते थेट नितीन गडकरी निवासस्थानी पोचले. गडकरी यांनी त्यांना घरी भोजनाचे निमंत्रण दिले होते. यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी व मातृभूमी प्रतिष्ठानचे छोटू भोयर उपस्थित होते. यानंतर सनी देओल यांनी गडकरी कुटुंबाच्या कुलदेवतेचेही दर्शन घेतले. त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची चौकशी करत देशहितासाठी काम करताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची विनंती केली. राजकीय व इतर विविध विषयावर काही काळ चर्चा केल्यानंतर त्यांनी गडकरी व कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतले. सनी देओल जवळपास दोन तास चर्चा झाली.


स्वातंत्र्य दिवसाच्या एक दिवस आधी सनी देओलने अखंड भारत दिवसाच्या एका कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी त्याने पर एकदा 'हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है, और जिंदाबाद रहेगा' अशी घोषणा करत सर्वांचे मने जिंकली. या कार्यक्रमात सनीने नितीन गडकरींचे तोंड भरुन कौतुकही केले.


आपल्या भाषणात सनी देओल म्हणाला, ‘अखंड भारत’ एक दिवस नक्की होणार. पुढे तो म्हणाला की, आपल्याला स्वातंत्र कोणी मिळवून दिले ते आपण विसरले नाही पाहिजे. यावेळी सनीने महात्मा गांधी, भगत सिंग, चंद्रशेखर आजाद, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य तिळक आणि अनेक स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांची आठवण करुन दिली.

X