Home | Gossip | sunny deol reveal one secret about his film 'gadar ek prem katha's climax

62 वर्षांच्या सनी देओलचा खुलासा - वेगळाच होता 'गदर' चा खरा शेवट, एका भीतीमुळे ऐनवेळी बदलला होता 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 04:28 PM IST

'गदर' च्या रिलीजच्या 18 वर्षानंतर सनी देओलने केले फिल्मशी निगडित एकही रंजक खुलासे

 • sunny deol reveal one secret about his film 'gadar ek prem katha's climax

  मुंबई : सनी देओल सध्या आपली अपकमिंग फिल्म 'ब्लॅन्क' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासंबंधित त्याने मीडियासोबत जेव्हा बातचीत केली तेव्हा 18 वर्षांपूर्वी रिलीज झालेली आपली सुपरहिट फिल्म 'गदर : एक प्रेम कथा' विषयी हैराण करणारा खुलासा केला. 62 वर्षांच्या सनीने सांगितले की, फिल्मचा शेवट खरे तर आधी असा नव्हता, जो ऑडियंसने पहिला. तो ऐनवेळी बदलला होता. त्याने हेदेखील सांगितले की, जर जुना शेवट दाखवला गेला असता तर फिल्म फ्लॉप होण्याची भीती होती.

  हा होता फिल्मचा खरा शेवट...
  सनीने सांगितले की, हर फिल्मच्या खऱ्या शेवटामध्ये गोळी लागल्यामुळे सकीना (अमीषा पटेल) चा मृत्यू होतो. सानी पुढे म्हणाला, "आम्हाला वाटले की, जर सकीनाचा मृत्यू झाला तर गोष्ट थोडी ट्रॅजिक होईल आणि ऑडियंसचा निगेटिव रिस्पॉन्स मिळू शकतो. त्यामुळे आम्ही फिल्मची एंडिंग हॅप्पी ठेवण्याचा निर्णय घेतला. याचमुळे आम्ही दाखवले की, कशी सकीना जेव्हा मुलाचे गाणे ऐकते आणि उठते."

  फिल्म बनण्यासाठी लागला होता 3 वर्षांचा वेळ...
  सनीने सांगितले, मेकर्सची अशी इच्छा होती की, 'गदर' चे शूटिंग लवकर संपावे. पण त्यांच्यासोबत डेट्सचा प्रॉब्लम होता. यामुळेच फिल्म पूर्ण व्हायला तीन वर्षांचा वेळ लागला. ही फिल्म 15 जून 2001 ला रिलीज झाली होती आणि सुपरहिट झाली होती. फिल्मचे डायलॉग्स आजही ऑडियंसला खूप आवडतात. एवढेच नाही तर फिल्ममध्ये सनी देओलने जो पाकिस्तानमध्ये हॅन्डपंप उखडण्याचा सीन केला होता त्यावर सोशल मीडियावर अनेकदा मीम्स बनत असतात.
  - सनीच्या 'ब्लॅन्क' बद्दल बोलायचे तर ही फिल्म 3 मेला रिलीज होत आहे. या फिल्मने ट्विंकल खन्नाचा भाऊ करण कपाड़िया बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.

Trending