आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीत ‘तारे जमीं पर’; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा, अमृता राव नांदेडमध्ये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभांत भाषणे करून राजकीय पक्षाचे नेते काही प्रमाणात थकले असताना आता चित्रपट क्षेत्रातील तारे प्रचारात उतरले आहेत. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटीची मदत घेण्याला सुरुवात झाली आहे. 

चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रचारासाठी जिल्ह्यात प्रथम हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी त्यांनी अर्धापूर, सिडको, तरोडा या ठिकाणी प्रचार सभा  घेतल्या. शत्रुघ्न सिन्हा पूर्वी भाजपचे खासदार होते. पंतप्रधान मोदींशी त्यांचे मतभेद झाल्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. परंतु राजकीय नेत्यापेक्षा त्यांची खरी ओळख चित्रपट अभिनेता म्हणून अधिक आहे. ‘खामोश’ या एका शब्दावर या शॉटगन यांना उभा देश अाेळखताे. या सिनेस्टारच्या प्रसिद्धीचा वापर राजकीय मंडळी करून घेणार हेही तितकेच स्वाभाविक आहे. त्यानुसार काँग्रेसच्या प्रचारासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी हजेरी लावली. शुक्रवारी भाजपचे खासदार व अभिनेते सनी देओल शहरात येत आहेत. भाजपच्या सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल भोकर येथे भाजपचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचार रॅलीत उपस्थित राहणार आहेत. शहरातही ते शिवसेना उमेदवार राजश्री पाटील व बालाजी कल्याणकर या उमेदवारासाठी रोड शो करणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. दि. १९ रोजी हदगावचे शिवसेना उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव येणार आहे. एकूण सध्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने तारे जमीं पर असे चित्र पहावयाला मिळत आहे.