आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

63 वर्षांचा झाला सनी देओल, जवळच्या मित्रासाठी सोडले होते तब्बल आठ चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडमध्ये आपल्या एक्शन आणि दमदार डायलाग्ससाठी प्रसिद्ध असलेल्या सनी देओलचा 63 वा वाढदिवस आहे. मोठ्या पडद्यावर नेही रागात दिसणारा सनी देओल खऱ्या आयुष्यात खूपच शांत आहे. त्याचा जवळचा मित्र आणि दिगदर्शक चंद्रप्रकाश द्विवेदीने एक किस्सा शेअर करत सांगितले की, सनीने त्याच्यासाठी आठ चित्रपट नाकारले होते. सनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आयुष्यातील असेच काही रंजक किस्से... 

चंद्रप्रकाश द्विवेदी, सनीचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक... 
चित्रपट तर मी त्याच्यासोबत केवळ एकच बनवला. पण त्याच्याशी माझे असे नाते आहे की, माझ्यासाठी त्याने आठ चित्रपट सोडले होते. या आठही वेळी त्याने मला विचारले की, भाऊ तुला हा चित्रपट करायचा आहे का ? मी नाही म्हणालो. त्यामुळे त्यानेही ते चित्रपट सोडले. तो म्हणायचं तुला आवडत नाही तर ठीक आहे चाल मीदेखील करणार नाही. एकदा मी त्याच्याकडे अमेरिकेला गेलो. तेव्हा त्याने विचारले की, तू तर शुद्ध शाकाहारी आहेस, इथे जिवंत कसा आहेस? मग त्याने मला एक शाकाहारी हॉटेलदेखील दाखवले. जिथे येण्या जाण्यासाठी 80 डॉलर खर्च लागायचा पण जेवण केवळ 9 डॉलरमध्ये मिळायचे. मी त्याच्यासारखा बालमनाला माणूस कधी नाही पाहिला. त्याच्यासोबत वाराणसीमध्ये शूटिंग करत होती, तेव्हा काही पोलिस अधिकारी त्याला भेटण्याबद्दल विचारू लागले. मी त्याला विचहरले तर तो म्हणाला की, सर्वाना बोलावून घे. 35-40 पोलिस अधिकारी आले तर त्याने त्यांना हॉटेलमध्ये जेवूही घातले. 

बॉबी देओल, सनीचा धाकटा भाऊ... 
आमच्या कुटुंबात कुणाचाही वाढदिवस असो. तर त्याला सर्वात आधी आई वडील विष करतात. सनी भैयाच्या वाढदिवशीही तेच सर्वात आधी विष करतील. आम्हाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देण्याबरोबरच खडतर मेहनत करण्याचीही ढिकवं ते देतात. आमच्याकडे प्रत्येक वाढदिवसाला सकाळी हवन करण्याची परंपरा आहे, त्यानंतर संपूर्ण फॅमिलीसाठी एक रूल आहे की, डिनरसाठी सर्वजण एकत्र नक्की येतात. सनी भैयाच्या वाढदिवशीही नेहमी असे होते. त्यांच्या बर्थडेच्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. सर्वात आधी हवन व्हायचे मग आम्ही लोणी लावलेल्या पराठ्यांवर जणू काही तुटून पडायचो. मग सर्व खाल्लेले पचवण्यासाठी ट्रेकिंगला जायचो. आम्ही एकत्रणेक आउटडोअर गेम्स खेळायचो. व्हॉलीबॉल आणि क्रिकेट खेळात मी सनी भैयासोबत खूप चांगला वेळ घालवला आहे. यावेळी त्यांचा वाढदिवसफॅमिली आनंदाने सेलिब्रेट करेल. मी यावेळी 'हाउसफुल 4' मुव्हीच्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये आहे. मी शनिवारी आपले काम लवकर पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन, जेणेकरून भैयाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी लवकरात लवकर मला मुंबईला पोहोचता येईल.