आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : इंडियन आयडलच्या 11व्या सत्राने प्रेक्षकांना आधीच भुरळ घातली आहे. या कार्यक्रमाच्या तारका-मंडित परीक्षकांच्या पॅनलमध्ये समावेश आहे, हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी यांचा. येत्या वीकएंडला आपले सर्वोत्तम स्पर्धक काही खास पाहुण्यांसमक्ष सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण सोबत भारतीय टेलिव्हिजनवरचा अत्यंत विनोदी कलाकार, मनीष पॉल हा करणार आहे. आपल्या स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी इंडियन आयडलच्या मागील सत्रातील सुपरस्टार गायक या कार्यक्रमात हाजरी लावणार आहेत.
इंडियन आयडल सत्र 11 मधील सनी हिंदुस्तानी, ज्याच्यात नुसरत साहेबांचा आत्मा असल्याचा आभास होतो, त्याने ऑडिशन्सपासूनच आपल्या अद्भुत गायकीने अनेक श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने केलेला संघर्ष हा देखील चर्चेचा विषय ठरला. लोकांचे बूट चमकवण्याचे काम करण्यापासून ते इंडियन आयडल या संगीत रियालिटी शोच्या सध्याच्या सत्रातील एक अत्यंत लोकप्रिय स्पर्धक होण्यापर्यंत त्याला बराच संघर्ष करावा लागला आहे. त्याने अलीकडेच कंगना रनोट अभिनीत व अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ चित्रपटात एक गीत गायले आहे. ही मोठी बातमी इंडियन आयडॉलच्या आगामी भागात उघडकीस आली.
त्याबरोबर, हे देखील समजले की, या चित्रपटाचे संगीतकार शंकर महादेवन यांना सनीचा आवाज आणि त्याची गायकी दोन्ही खूप आवडले होते. केवळ तोच नाही, तर गीतकार जावेद अख्तर यांना देखील त्याचा आवाज खूप मोहक वाटला होता.
इंडियन आयडलबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सनी म्हणाला, "हा मंच मला दिल्याबद्दल मी इंडियन आयडलचा खूप ऋणी आहे, कारण याच मंचावरून मी माझी प्रतिभा प्रदर्शित करू शकलो. त्याच बरोबर, मी अश्विनी अय्यर तिवारी मॅम, शंकर सर आणि जावेद सरांचा देखील आभारी आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग करत असताना या सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. प्रत्येक गायक ज्याची प्रतीक्षा करतो, अशी ही संधी होती आणि मला कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीसच ही संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. माझ्या या वाटचालीत ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतो."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.