आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sunny Hindustani Sings 'Jia Dhadak Dhadak Jaay', Kunal Khemu Gladly Gave The Locket Of Goddess Lakshmi To Him

सनी हिंदुस्तानीने गायले 'जिया धडक-धडक जाए', कुणाल खेमूने खुश होऊन दिले देवी लक्ष्मीचे लॉकेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : सनी हिंदुस्तानी इंडियन आयडल सीजन 11 च्या स्पर्धकांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या गाण्याने एक उत्तम फैन बेस बनवला आहे. इंडियन आयडलच्या जजपासून ते शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांपर्यंत, सर्व सनीच्या हृदयस्पर्शी आवाजाचे खूप कौतुक करतात. या वीकेंडमध्ये 'मलंग' चित्रपटाची टीम - अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि कुणाल खेमू आपल्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी इंडियन आयडलच्या मंचावर दिसणार आहेत. 

सनीचे गाणे ऐकून सेलेब्स झाले प्रभावित... 

सनी हिंदुस्तानीने यावेळी 'जिया धड़क धड़क जाए' गाण्याचे उत्तम सादरीकरण केले. सनीचा परफॉर्मन्स पाहून कुणालदेखील जुन्या आठवणींमध्ये गुंतला आणि त्याने सांगितले की, 'कलयुग' चित्रपट त्याच्यासाठी नेहमीच विशेष राहील. एवढेच नाही, सनीच्या गाण्याने प्रभावित होऊन त्याने सनीला देवीची मूर्ती असलेले एक लॉकेटदेखील गिफ्ट केले आणि म्हणाला की, देवी लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहो. 

कुणालने दिले गिफ्ट... 

कुणाल खेमू म्हणाला, "तुला देवी सरस्वतीने सुंदर आवाजाचा आशीर्वाद दिला आहे. माझी इच्छा आहे की देवी लक्ष्मीदेखील सदैव तुझ्या सोबत राहो, यासाठी मी तुला देवी लक्ष्मीचे हे लॉकेट दिले आहे. माझी प्रार्थना आहे की, या मंचावरून तू यशाच्या नव्या उंचीवर पोहोचावे." नेहा कक्कड म्हणाली, "हे गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. या गाण्यासाठी मला सनीकडून खूप अपेक्षा होत्या आणि तू या गाण्याला पूर्णपणे न्याय दिला आहे. ज्याप्रमाणे तू या गाण्याचे स्वर लावले, ते अद्भुत आहे." या शोमध्ये पुढे दिशा म्हणाली की, सनीचा आवाज ऐकल्यानंतर तिला कैलाश खेर यांची आठवण आली. एवढ्या मोठ्या सिंगरसोबत आपली तुलना झालेली पाहून सनीलाही खूप आनंद झाला.