आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुष्का शर्मा-प्रियांका चोप्राला मागे टाकत सनी लियोनी फेसबुकवर बनली ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलिवूड’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : फेसबुकवर 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलिवूडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामुळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे.   सनी लियोनीनंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा दुस-या क्रमांकावर आहे. फेसबूकवर 9.8 मिलीयन फोलोवर्स असलेल्या अनुष्का शर्माचे विराट कोहलीसोबतच्या व्हेकेशनचे फोटो आणि अपडेट्सना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आणि त्यामुळेच 73.22 गुणांसह अनुष्का, दुसरी मोस्ट एंगेजिंग बॉलिवूड एक्टेस झाली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. सनी लियोनीचे दुबई टूरचे फोटो आणि व्हिडीयोज, तसेच आपल्या कुटूंबियांसोबतच फोटो, आपल्या स्टाइलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडिओ यामुळे सनीच्या चाहत्यांची तिच्या फेसबुक अकाउंटवर एंगेजमेंन्ट वाढलेली दिसून आलीय. अनुष्काच्या भूतान ट्रिपच्या फोटोंना तिच्या आणि विराटच्या चाहत्यांची पसंती मिळालेली दिसून आलीय.   फेसुबकवर 40 मिलीयन फॉलोअर्स असलेल्या प्रियांका चोप्राला 60.72 गुणांमूळे तिसरे स्थान मिळाले आहे. काही दिवसांसाठी दिल्लीत आलेल्या प्रियांकाचे फेसबुकवर कमी अपडेट्स पाहायला मिळाले. तर फेसबुकवर 14 मिलीयन फॉलोअर्स असलेल्या कतरिना कैफचे व्होग मॅगझिनसाठी केलेले हॉट फोटोशूट आकर्षण ठरले आणि त्यामूळेच 58.42 गुणांसह ती लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. 23 मिलीयन फोलोअर्स असलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या दबंग टूरच्या अपडेट्समूळे ती मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...