Home | News | Sunny Leone Pool Party Video Went Viral

सनी लियोनीने मित्रांसोबत केली पूल पार्टी, मस्ती मूडमध्ये एका मुलाला पूलमध्ये ढकलले, मैत्रिणीने असा घेतला सनीचा बदला : Video 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 09, 2019, 12:00 AM IST

व्हिडिओ पाहून मजा घेत आहेत सोशल मीडिया यूजर्स, म्हणाले - जशी करनी तशी भरणी 

  • Sunny Leone Pool Party Video Went Viral

    मुंबई. सनी लियोनीचा पूल पार्टी एन्जॉय करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सनी लियोनी काही मित्रांसोबत पूलच्या बाहेर डान्स करताना दिसतेय. या काळात सनी थोड्या फनी मूडमध्ये दिसते आणि एका डान्स करणा-या मुलाला पूलमध्ये धक्का देते. यानंतर सनी त्याची मजा घेते. पण सनीने स्वतःला सावरण्यापुर्वीच एक मुलगी सनीला पूलमध्ये ढकलते. सोशल मीडियावर सनीने स्वतःचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

    काही तासात व्हायरल झाला व्हिडिओ
    सनी लियोनीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासातच व्हायरल झाला. याला 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्स करत आहेत. एक व्यक्ती म्हणाला - जशी करनी तशी भरणी. सनीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सनी लवकरच मल्याळम फिल्म 'रंगीला'मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती 'वीरमादेवी' आणि 'अरोग्य' या दोन तामिळ चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Trending