आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 वर्षांपासून क्रू बॉयची देखरेख करतेय सनी लियोनी, आता किडनी ट्रान्सप्लांटसाठी जमा करतेय फंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सनी लियोनी सध्या आपल्या एका क्रू बॉयसाठी फंड कलेक्ट करण्याचे काम करतेय. हा क्रू बॉय सध्या किडनी फेल्यूअरचा सामना करतोय. अशा वेळी सनीने त्याच्यासाठी सोशल मीडियावर मदत मागितली आहे. 


क्रू बॉय आपल्या मुलांचा मामा आहे असे सांगते सनी
सनीने इंस्टाग्रामवर लिहिले की, "हॅलो माझे नाव करणजीत वेबर आहे आणि मी माझा मित्र प्रभाकरसाठी फंड जमा करतेय. प्रभाकर हा माझ्या पुर्ण टीमच्या शूटिंग दरम्यान मदत करतो."
"प्रभाकर हा माझी मुलगी निशा आणि माझे दोन्ही मुलं अशेर-नोहचा मामा देखील आहे. त्याच्या कुटूंबात हा एकटाच कमावणारा आहे, अशा वेळी प्रभावकरच्या ट्रीटमेंटचा खर्च त्याच्या कुटूंबाला करावा लागतो. त्यांना अनेक अडचणी येत आहे. कुटूंबात पत्नी, आई आणि एक मुलगा आहे, हे सर्व प्रभाकरवर अवलंबून आहेत."


- "प्रभाकर किडनी फेल्यूअरचा सामना करतोय. एक वर्षे त्याला एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. येथे त्याच्यावर योग्य उपचारही केले जात नव्हते. उलट हॉस्पिटलमधील लोक त्याची किडनी काढून घेणार होते. ऑर्गनसाठी त्याला मारुन टाकण्यात येणार होते."
"माझे पती डेनियल आणि मला याविषयी काहीच माहिती नव्हती. ज्या दिवशी प्रभाकरची किडनी काढण्यात येणार होती, त्याच दिवशी त्याच्या कुटूंबाला हॉस्पिटलने बिल दिले. तेव्हा आम्हाला याविषयी कळाले आणि आम्ही प्रभाकरला तात्काळ दूस-या चांगल्या दवाखान्यात दाखल केले."
- "नवीन हॉस्पिटलमध्ये किडनी स्पेशलिस्टला दाखवल्यानंतर आम्हाला कळाले की, त्याची किडनी फक्त 20 टक्के काम करतेय. डॉक्टर्सने सांगितले की, प्रॉपर जेवण आणि मेडिटेशन केल्याने ते पुर्ण एक वर्षे आरामात जिवंत राहील."


आता प्रभाकरला किडनी ट्रान्सप्लांट करणे गरजेचे आहे 
सनीने पुढेल लिहिले की, "प्रभाकरचे पुर्ण कुटूंब त्याच्या इनकमवर अवलंबून आहेत. त्याच्या मेडिकल कंडीशननुसार त्याला आराम करणे खुप गरजेचे होते. आता प्रभाकरला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारण त्याची किडनी पुर्णपणे खराब झाली आहे."
- "काही दिवसांपुर्वी प्रभाकरची बिघडती तब्येत पाहून त्याला मृत घोषित करण्यात आले होते. परंतू देवाचा चमत्कार झाला आणि तो मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा परतला. आता प्रभाकरला किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. यानंतर तो पुर्णपणे बरा होऊ शकेल. अशा वेळी जो फंड मला मिळेल. तो पुर्ण प्रभाकरच्या आजाराची उपयोगात आणला जाईल."

 

बातम्या आणखी आहेत...