आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनचा मोबाइल नंबर समजून तरुणाला येत आहेत असंख्य फोन कॉल्स, त्याची झोप तर उडालीच सोबत नोकरी जाण्याचीही उद्भवली भीती 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री सनी लियोनच्या मोबाइल नंबरने एका युवकाची झोप उडवली आहे. कारण त्या नंबरवर रोज 500 कॉल येत आहेत आणि या कारणाने त्याची नोकरीदेखील जाण्याच्या मार्गावर आहे. झाले असे की, सनी लियोनने 'अर्जुन पटियाला' चित्रपटातील एका सीनमध्ये आपला मोबाइल नंबर सांगते, पण खरं तर तो नंबर दिल्लीच्या एका खाजगी कंपनीच्या सिनिअर एग्जीक्यूटिव्हचा मोबाइल नंबर आहे. लोकांनी हा सनी लियोनचा नंबर समजला आणि आता त्या नंबरवर मागच्या दोन दिवसांमध्ये 500 पेक्षा जास्त कॉल येत आहेत. परदेशातूनदेखील व्हिडीओ कॉल येत आहेत. फोन उचलताच अश्लील पद्धतीने बोलत लोक सनी लियोनबद्दल विचारू लागतात.  

 

या कॉलमुळे कंपनीने त्याला नोकरीवरून काढण्याचीही सूचना दिली आहे. परेशान होऊन एग्जीक्यूटिव्हने दिल्लीच्या प्रितमपूरा पोलिस स्टेशनमध्ये सनी लियोनसोबत चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दिल्लीच्या प्रिमपुराच्या जेयू ब्लॉकयामध्ये राहणारा पुनीत अग्रवाल एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सिनिअर एग्जीक्यूटिव्ह आहे. 

बातम्या आणखी आहेत...