आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येत्या वर्षात सुपर-30च्या धर्तीवर राज्यातही केंद्रे स्थापन करणार, सुप्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांची माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माध्यमांशी बोलताना विद्यापीठीय राजकारणाचा स्तर खालावू न देण्याचे आवाहन'

नागपूर- येत्या वर्षात "सुपर-30"च्या धर्तीवर राज्यातही केंद्रे स्थापन करणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांनी दिली. सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेसाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. आज शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आराखडा आखण्यात येत असल्याचे आनंदकुमार म्हणाले.


वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर बोलताना, श्रीमंत विद्यार्थ्यांकडून जरूर शुल्क आकारण्यात यावे. मात्र गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली पाहिजे, असे ते म्हणाले. विद्यापीठीय स्तरावर राजकारण करायला हरकत नाही. पण त्याचा स्तर खालावता कामा नये, असे ते म्हणाले. डॉक्टर झाल्यानंतर तीन वर्षे ग्रामीण भागात काम करण्याचा करार लिहून घेतल्या जातो. तद्वतच आय. आय. टी. झालेल्यांकडून लिहून घ्यायला पाहिजे. त्याचा फायदा देशाला होईल. एरव्ही अपवाद वगळता सर्व विद्यार्थी परदेशातच जातात, असे आनंदकुमार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...