आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Super 30' Director Vikas Bahal Gets Big Relief, In Metoo Case He Gets Clean Chit

'सुपर 30' चा डायरेक्टर विकास बहलला मोठा दिलासा, Metoo प्रकरणात मिळाली क्लीन चिट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रिलायंस एंटरटेनमेंटच्या इंटरनल इंक्वायरीमध्ये सेक्सुअल हरेसमेंटचा आरोप  असलेला 'क्वीन' सारख्या चित्रपटाचा डायरेक्टर विकास बहलला आता क्लीन चिट मिळाली आहे. आता तो पुन्हा ऋतिक रोशन स्टारर 'सुपर 30'मध्ये डायरेक्टर म्हणून परतणार आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याची प्रोडक्शन कंपनी 'फँटम फिल्म्स'च्या एका महिला कर्मचारीने त्याच्यावर #MeToo कॅम्पेनमध्ये सेक्सुअल हरेसमेंटचा आरोप केला होता, त्यानंतर त्याला चिवत्रपटापासून वेगळे केले गेले होते. फँटमसोबतच रिलायंस एंटरटेनमेंटमध्ये 50 टक्क्यांचा भागीदार आहे.  

 

रिलायंस एंटरटेनमेंटच्या सीईओने दिले कन्फर्मेशन... 
रिलायंस एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ शिबाशीष सरकारने बातमी कन्फर्म करत सांगितले, "हो, अंतर्गत तक्रार समितीने विकास बहलला दिलासा दिला आहे.  समितीकडून क्लीन चिट मिळाल्यांनतर आम्ही त्याचे नाव 'सुपर 30' डायरेक्टर म्हणून सामील केले आहे." सांगितले जात आहे की, पुढच्या आठवड्यात रिलीज होत असलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विकासला डायरेक्टर म्हणून क्रेडिट दिले जाणार आहे.

 

समितीसमोर हजर झाली नाही तक्रारकर्ता... 
एका न्यूज वेबसाइटच्या बातमीनुसार, पुन्हा पुन्हा आठवण करून दिल्यांनतरही तक्रारकर्ता समिती समोर आली नाही. विकासला क्लीन चिट दिल्या जाण्यामागे हे एक मोठे कारण आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये फँटम फिल्म्सच्या एका महिला कर्मचारीने आरोप केला होता की, बहलने चित्रपट 'बॉम्बे वेलवेट' च्या प्रमोशनल टूरदरम्यान तिचे लैंगिक शोषण केले होते. 

 

मोडले होते फँटम फिल्म्स... 
बहलवर सेक्सुअल हरेसमेंटचा आरोप झाल्यानंतर त्याचे तीन सहकारी अनुराग कश्यप, मधु मंतेना आणि विक्रमादित्य मोटवानेने कंपनीच्या विघटनाचा निर्णय घेतला होता. जेव्हा अनुरागला विचारले गेले होते तो महिलेसोबत उभा का नाही राहिला तर त्याने सांगितले होते की, त्याच्या कंपनीने विकाससोबतचे सर्व संबंध तोडले होते आणि महिलेला माफीनामादेखील पाठवला होता.  

 

ऋतिकने सोबत काम करण्यासाठी दिला होता नकार... 
प्रकाराबणं समीर आल्यानंतर ऋतिक रोशनने ट्वीटमध्ये लिहिले होते की, अशा कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणार नाही, ज्याच्यावर सेक्सुअल हरेसमेंटसारखे गंभीर आरोप लागलेले असतील. ऋतिकने प्रोड्यूसर्सला निवेदनदेखील केले होते की, त्यांनी प्रकरणाचा तपस करावा आणि निर्णय घ्यावा. त्याच्यानंतर लगेच बहलचे नाव 'सुपर 30' मधून हटवले गेले होते.