आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Super 30 Movie In A Fresh Legal Trouble IIT Students Planing To Take Stay On Film Release

ऋतिकच्या सुपर-30 चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा, प्रदर्शन थांबवण्यासाठी IIT चे विद्यार्थी करत आहेत तयारी, हे आहे कारण....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - 8 महिन्यांपूर्वी गुवाहटी हायकोर्टाने सुपर - 30 चे आनंद कुमार विरोधात नोटीस जारी केली होती. आता पुन्हा एकदा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे दिसत आहे. गणिततज्ञ आनंद कुमार विरोधात फसवणूकीचा आरोप करत जनहित याचिका दाखल केलेले आयआयटीचे विद्यार्थी सुपर - 30 चित्रपटाचे रिलीज न होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 12 जुलै रोजी सुपर-30 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

प्रदर्षण थांबवण्यासाठी करत आहेत तयारी 
मिड डे च्या बातमीनुसार आयआयटीचे विद्यार्थी अविनाश बारो, बिकास दास, मोंजित डोळे आणि धनीराम टॉने यापूर्वीही आनंद कुमार विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. फसवणूकीचे आरोप असणाऱ्यावर चित्रपट कसाकाय बनवू शकता असे त्यांचे म्हणणे आहे. 


वकिलाने सांगितले उत्तर समाधानकारक नाही
रिपोर्टमध्ये विद्यार्थ्यांचे वकिल अमित गोयल यांनी सांगितल्यानुसार लिहिल आहे की, 'हा चित्रपट पूर्णपणे खोटा वाटतो. आम्ही कधीच या चित्रपटाला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांच्य विरोधात कोर्टात खटला सुरू आहे. त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत समाधानकारक नाही. ते आजपर्यंत कोर्टात नावांच्या खुलासा करू शकले नाही. अशात हा चित्रपट चुकीचा संदेश देऊ शकतो.'


असे आहे पूर्ण प्रकरण
आयआयटी विद्यार्थ्यांनुसार आनंद आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाबाबत खोटे दावे करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2016 मध्ये आयआयटी जेईई करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. गुवाहटी उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी आनंद यांना एक नोटीस दिली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबत उत्तर देण्यास सांगितले होते. दरम्यान आनंद कुमार यांनी कथितरित्या जनहित याचिकेबाबत उत्तर दिले नाही. 

 

यापूर्वीही झाली आहे चित्रपटांची निर्मिती
आनंद कुमारी यांची कथा पडद्यावर दाखविण्याची ही पहिली वेळ नाहीये. डिस्कव्हरी चॅनलने आनंद आणि त्यांच्या सुपर-30 बॅचवर 1 तासाचा माहितीपट बनवला होता. एसटीबी रिसर्च इन्स्टीट्यूट, जपानचे मुख्य अर्थशास्त्री योइची इटोहने देखील जपानच्या एनएचके चॅनलसाठी सुपर-30 वर एक चित्रपट बनवला होता. त्यांनी आनंद यांनी घेतलेल्या पुढाकाराला 'सीक्रेट वेपन ऑफ इंडिया' असे संबोधले होते.