आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुप्रतिक्षीत 'सुपर 30' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आनंद कुमार यांचे पात्र साकारतोय ऋतिक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - खूप दिवसांपासून फायनल रिलीज डेटची वाट पाहात असलेल्या ऋतिक रोशनचा चित्रपट 'सुपर 30' चा ट्रेलर अखेर रिलीज झाला. ट्रेलरची सुरुवात आनंद कुमारच्या बालपणापासून करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा एक इंस्टीट्यूट जॉइन करण्याचा आणि मग सुपर 30 ची सुरुवात करण्याचा प्रवास दाखवला गेला आहे. ऋतिक चित्रपटात आनंदच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चित्रपट 12 जुलैला रिलीज होईल.  

 

ट्रेलरमध्ये काय आहे खास... 
ट्रेलरमध्ये ऋतिकचा लुक एकदम बदललेला दिसत आहे. वाढलेले वजन आणि भोजपुरी भाषेत ऋतिकने अनेक असे डायलॉग बोलले आहेत जे आनंद कुमारने कधीकाळी आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी बोलले असतील.  

 

डायलॉगदेखील आहेत खास... 
ऋतिकने चित्रपटात अनेक डायलॉग बोलले आहेत, ज्यामध्ये "जब समय आएगा तब सबसे बड़ा और सबसे लम्बा छलांग हम ही मारेगा."असाच आणखी एक  डायलॉग जो चित्रपटाच्या पोस्टरमध्येदेखील दिसला होता, "आज राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा."

 

कंगनाच्या चित्रपटाला घाबरला ऋतिक...! 
चित्रपटाच्या क्लॅशमुळे ऋतिक खूप परेशान होता. त्याच्यासाठी 'सुपर 30' एक खूप महत्वाचा चित्रपट आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा वाद नको होता. त्यामुळे त्याने दिग्दर्शकांना विनंती केली की, त्यांनी एक नवी डेट ठरवावी. आता हा चित्रपट 12 जुलाईला रिलीज होणार आहे. 'सुपर 30' छबी पहिला लुक मागच्यावर्षी 5 सप्टेंबरला रिलीज केला गेला होता. ऋतिकचे म्हणणे होते की, त्याचा चित्रपट टीचरवर आधारित आहे त्यामुळे 5 सप्टेंबर योग्य तारीख असेल. तसेच ऋतिकने पूर्वी हेही स्टेटमेंट दिले होते की, त्याला 'मेंटल है क्या' सोबत कोणताही क्लॅश नको आहे. त्याची इच्छा नव्हती की, दोन्ही चित्रपटांची टक्कर व्हावी आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद व्हावा.