आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ सर्वोत्तम अभिनयाचा आविष्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९७० मध्ये श्रीलाल शुक्ल यांनी ‘राग दरबारी’ कादंबरी लिहिली. भारताला जाणून घेण्यासाठी वेदव्यासांचे ‘महाभारत’, नेहरूंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि ‘राग दरबारी’ आपणास मदत करतात. ही कादंबरी लिहून बरीच वर्षे झाली पण परिस्थिती जैसे थे आहे. श्रीलाल शुक्ल यांनी नमूद केले की, भारतातील शिक्षणप्रणाली रस्त्यावर पडलेल्या त्या कुत्रीसारखी आहे, जिला सगळेच जण झिडकारतात पण तिला सुधारण्याचा कोणी प्रयत्न करीत नाहीत. यावर बिहारमधील एक शिक्षक आनंद कुमार यांनी ‘सुपर थर्टी’ नामक बायोपिक बनवली, जी प्रदर्शित झाली असून संसदेतही दाखवू शकतात.


आपल्या अर्थसंकल्पातील बहुतांश खर्च शस्त्रास्त्र खरेदीवर होतो, पण देशाची सुरक्षा शिक्षणावर अवलंबून आहे. या विषयावरील आमिर खान आणि राजकुमार हिरानीचा ‘थ्री इडियट्स’ एका आदर्शाप्रमाणे मानला जातो. शिक्षणातील परीक्षा गुणांना मानले जाते, पण मूळ उद्देश उपेक्षितच राहतो. काही वर्षांपूर्वी प्रकाश मेहरांचे भागीदार आणि सहकाऱ्यांचा चिरंजीवाने परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या केली. त्याच्या अंत्ययात्रेवेळी विद्यापीठाने सांगितले की, तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता, पण आमच्या निकालात चुका होत्या. 


आनंद अत्यंत हुशार विद्यार्थी असून त्याची केम्ब्रिज विद्यापीठात निवड झाली होती, पण तो खर्च त्याला न परवडणारा होता. सुवर्णपदकाने सन्मानित करताना मंत्र्यांनी त्याला पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासनही दिले असल्याने तो व त्याचे वडील नंतर मंत्र्यांना भेटण्यास गेले व पण त्यांची खिल्ली उडवण्यात आली. चित्रपटात खासगी प्रशिक्षण केंद्र चालवणारे एक पात्र आहे, जे आनंदला भरपूर पैसे देते. त्यांच्याकडे शिकवण्याचे काम देतात. यावरच प्रकाश झा यांनी ‘आरक्षण’ बनवला. येथे उच्चभ्रू विद्यार्थी आलेले असून कोणत्याही प्रकारे ते पदवी घेऊ इच्छितात. आनंदमुळे तो व्यवसाय वाढला पण एके रात्री तो रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात एकास अभ्यास करताना पाहतो. त्या वेळी तो नोकरी सोडून अशा वंचितांना शिकवण्याचा निर्णय घेत, नवी शिक्षणसंस्था काढतो. या वेळी त्याचे प्रयत्न उलथून टाकण्याचे प्रयत्न होतात. त्याच्या संस्थेची वीज कापणे व अन्य प्रकार केले जातात, त्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न होतात. परंतु विद्यार्थी शिक्षण सुरू ठेवतात. 


यातच एक प्रेमकथा दर्शवली आहे. त्याचे विद्यार्थी आणि धनिकांच्या विद्यार्थ्यात स्पर्धा व्हावी असे सुचवण्यात येते. या वेळी त्याची पूर्वीची प्रेयसी जी सध्या एका धनिकाची पत्नी आहे, ती त्याला मदत करते. धंदेवाईक ट्यूशनवाल्यांना मंत्री आनंदचा खून करण्यास सांगताे, पण सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. चित्रपटांच्या संगीतात सरस्वती मातेची आराधना करणाऱ्या श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. एका प्रसंगात संस्कृत श्लोक आहेत, म्हणून आपण द्रोणाचार्यांच्या शिक्षण देण्याच्या गोष्टीला संपवतो. आचार्य द्रोणाचार्य कौरवांच्या १०५ विद्यार्थ्यांसह अरण्यात येतात. या वेळी येथे कोणतेच गुरुकुल नाही असे दुर्योधन विचारतो. त्या वेळी त्यांच्याकडून एका गुरुकुलाची उभारणी करण्यात येते. यादरम्यान त्यांचे निम्मे शिक्षण पूर्ण होते. काही वर्षांनी द्रोणाचार्य शिक्षण पूर्ण झाल्यामुळे गुरुकुल तोडण्यास सांगतात. या वेळी दुर्योधन विरोध करताे, पण पांडव ते तोडतात. द्रोणाचार्य म्हणतात, शिक्षणाचा उद्देश्य चरित्र-निर्माण आणि संपत्तीचा मोह त्यागणे हेच खरे शिक्षण आहे. ‘सुपर ३०’ मध्ये हृतिक रोशन आजवरच्या अभिनयापैकी एका सर्वश्रेष्ठ अभिनयाची छबी दर्शवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा चित्रपट पाहण्याचे हे एक कारण होऊ शकेल.